जिल्ह्यात दरमहा ८-१० पॉस मशिन तांत्रिक कारणाने बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 11:57 AM2018-02-28T11:57:06+5:302018-02-28T11:57:06+5:30

बायोमेट्रीक रेशनकार्डसाठी तयारी सुरू

8-10 POS machines are closed for technical reasons every month | जिल्ह्यात दरमहा ८-१० पॉस मशिन तांत्रिक कारणाने बंदच

जिल्ह्यात दरमहा ८-१० पॉस मशिन तांत्रिक कारणाने बंदच

googlenewsNext
ठळक मुद्देबंद मशिनमुळे अडथळाबायोमेट्रीक रेशनकार्डसाठी माहिती मागविणे सुरूआधारकार्डची प्रत देणे आवश्यक

जळगाव: बायोमेट्रीक रेशनकार्ड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने रेशनकार्डधारकांकडून माहिती घेणे सुरू केले असले तरीही मार्चपासून अंमलबजावणी करावयाच्या जिल्ह्यांमध्ये जळगावचा समावेश नाही. त्यामुळे हे काम पूर्ण करण्यास प्रशासनाला अधिक कालावधी मिळणार आहे. दरम्यान पॉस मशिनद्वारे धान्यवितरण सुरू करण्यात आले असले तरीही जिल्ह्यात दरमहिन्याला ८-१० मशिन तांत्रीक कारणांमुळे बंद पडत असल्याने त्या ठिकाणी लाभार्थी वंचित राहू नये यासाठी पूर्वीच्याच पद्धतीने धान्य वितरण करावे लागत आहे. मशिन बंद पडणे व दुरूस्ती करण्याची प्रक्रिया सातत्याने सुरूच असल्याने जिल्ह्यात पॉस मशिनद्वारे धान्य वितरणाचे उद्दीष्ट ९९ टक्क्यांपर्यंत गेले आहे.
६ तालुक्यात १०० टक्के मशिन सुरू
फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील अमळनेर, भडगाव, बोदवड, चोपडा, जामनेर, यावल, चाळीसगाव, रावेर या सहा तालुक्यात १०० टक्के पॉस मशिन सुरू होते. तर उर्वरीत तालुक्यांमध्ये ९८ ते ९९ टक्के मशिन सुरू होते.
रेकॉर्डवरून १ दुकान गायब
एकूण १९२९ रेशन दुकाने असून त्यापैकी १९१७ रेशन दुकानांना धान्य पुरविले जाते. त्यापैकी १९१६ रेशन दुकानांचे रेकॉर्ड पुरवठा विभागाकडे असून एक दुकान पुरवठ्याच्या रेकॉर्डमधून गायब आहे. त्याचा शोध घेणे सुरू आहे. या १९१६ दुकानांपैकी १९०७ दुकानांमधील पॉस मशिन फेब्रुवारी महिन्यात कार्यरत होते. म्हणजेच त्यामार्फतच धान्य वितरण झाले. तर ६ तालुक्यातील ९ रेशन दुकाने तांत्रिक कारणाने बंद  होते.
बायोमेट्रीक रेशनकार्डसाठी तयारी सुरू
जिल्ह्यात मार्चपासून बायोमेट्रीक रेशनकार्ड लागू होणार नसले तरीही एप्रिलपासून ते लागू करण्याची सक्ती केली जाऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात एकूण ९ लाख ७० हजार ८४३ रेशनकार्डधारक आहेत. त्यात अंत्योदय योजनेचे १ लाख ३७ हजार ५४२ तर प्राधान्य योजनेचे ४ लाख ६५ हजार ८९४ रेशनकार्ड धारक आहेत. उर्वरीत केशरी व पांढºया शिधापत्रिकाधारक आहेत. यातील अंत्योदय व प्राधान्य योजनेतील रेशनकार्डधारकांनाच रेशनचे वितरण होते. मात्र सर्व रेशनकार्डधारकांना बायोमेट्रीक रेशनकार्ड पद्धत लागू होणार असून त्यासाठी प्रत्येक रेशनकार्ड धारकाकडून त्या कार्डवरील सर्व सदस्यांच्या आधारकार्डची झेरॉक्स मागविली जात आहे. ती माहिती आरसीएममध्ये भरण्याचे काम सुरू आहे. लाभार्थ्यांकडून त्यास प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. त्याशिवाय हे काम तातडीने पूर्ण होणे शक्य नाही. त्यामुळे तहसीलदारांना रेशनकार्डधारकांकडून तातडीने माहिती मागविण्याचे आवाहन करण्यातआलेआहे.

Web Title: 8-10 POS machines are closed for technical reasons every month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.