पणन महासंघाकडून जळगाव विभागात ८ कापूस खरेदी केंद्र सुरु होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 09:21 PM2017-10-13T21:21:26+5:302017-10-13T21:23:18+5:30

महाराष्टÑ राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने जळगाव विभागात आठ कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी प्रक्रिया सुरु केली असून जिनिंग व्यावसायिकांकडून २३ आॅक्टोबरपर्यंत निविदा मागविण्यात आल्या आहेत.

8 cotton procurement centers will be started in Jalgaon division by the Marketing Federation | पणन महासंघाकडून जळगाव विभागात ८ कापूस खरेदी केंद्र सुरु होणार

पणन महासंघाकडून जळगाव विभागात ८ कापूस खरेदी केंद्र सुरु होणार

Next
ठळक मुद्देनिविदा मागविल्याजिल्ह्यात धरणगाव, साकळी, मुक्ताईनगर, अमळनेर, व पारोळा येथे केंद्रधुळे जिल्ह्यात एक व नाशिक जिल्ह्यात दोन केंद्र

आॅनलाईन लोकमत

जळगाव,दि.१३-महाराष्टÑ राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने जळगाव विभागात आठ कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी प्रक्रिया सुरु केली असून  जिनिंग व्यावसायिकांकडून  २३ आॅक्टोबरपर्यंत निविदा मागविण्यात आल्या आहेत.

राज्यभरात खाजगी जिनिंगमध्ये कापूस खरेदीस सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता पणन महासंघाकडून देखील लवकरच  जळगाव विभागात पणनकडून आठ केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. विदर्भानंतर जळगाव व धुळे जिल्'ात कापसाचे सर्वाधिक उत्पादन होत असते.
पणन महासंघाकडून आठ केंद्र सुरु करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले असले, तरी हे केंद्र केव्हा सुरु होतील. याबाबत शासनाकडून कोणतीही माहिती अद्याप उपलब्ध नसल्याची माहिती पणनच्या सूत्रांनी दिली.

इन्फो-
धुळे जिल्ह्यात एक व नाशिक जिल्ह्यात दोन केंद्र
 गेल्या वर्षी पणनकडून जळगाव विभागात सात केंद्र सुरु केली होती. यावर्षी आठ केंद्र सुरु होत असून, जळगाव जिल्'ात धरणगाव, यावल तालुक्यातील साकळी, मुक्ताईनगर, अमळनेर, व पारोळा ही पाच केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. त्यानंतर धुळे जिल्'ात एक व नाशिक जिल्'ातील मालेगाव व अंडरसूल ता.येवला येथे केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. २३ आॅक्टोबर दुपारी २.३० वाजेपर्यंत जळगावातील कार्यालयात आपल्या निविदा जमा करायच्या आहेत. तसेच २३ रोजी दुपारी ३ वाजता या निविदा उघडण्यात येणार आहेत.

Web Title: 8 cotton procurement centers will be started in Jalgaon division by the Marketing Federation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.