जळगावात निवडणूक काळात ८ जणांना प्रवेश बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 01:08 PM2018-07-28T13:08:28+5:302018-07-28T13:08:40+5:30
महापालिका निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये
जळगाव : , निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी म्हणून एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आठ जणांना शहर व तालुक्यात २८ जुलै ते ५ आॅगस्ट या कालावधीत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. प्रांताधिकाऱ्यांनी या आठ जणांवर फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) नुसार कारवाई केली आहे. १ आॅगस्ट रोजी दुपारी ३ ते ५.३० या वेळेत मतदान करण्यासाठी त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे.
या आठ जणांना शहरात बंदी
भास्कर विश्वे, अर्जुन विजयसिंग बागडे, नितीन रोहीदास चव्हाण, पिन्या उर्फ दिनकर रोहीदास चव्हाण, आकाश दिलीप परदेशी (सर्व रा.सुप्रीम कॉलनी), नवनाथ आसाराम शिंदे (रा.रामनगर), अजय बिरजु गारुंगे (रा.कंजरवाडा) व पंकज उर्फ परशुराम पाटील (रा.एमआयडीसी) यांंचा त्यात समावेश आहे. या सर्वांविरोधात विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.