प्राचार्य गटाच्या ८ जागा बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 01:16 PM2017-08-29T13:16:23+5:302017-08-29T13:23:33+5:30
उत्तर महाराष्ट विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील प्राचार्यांच्या गटामधुन अधिसभेच्या दहा जागांपैकी आठ जागा बिनविरोध झाल्या आहेत. महिला राखीव गटाच्या एका जागेसाठी आता १७ सप्टेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे.
आॅनलाईन लोकमत,
जळगाव-दि.२९,-उत्तर महाराष्ट विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील प्राचार्यांच्या गटामधुन अधिसभेच्या दहा जागांपैकी आठ जागा बिनविरोध झाल्या आहेत. महिला राखीव गटाच्या एका जागेसाठी आता १७ सप्टेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. तर भटक्या विमुक्त जमाती राखीव गटातील एक अर्ज बाद ठरल्याने ही जागा रिक्त राहणार आहे.
उत्तर महाराष्ट विद्यापीठाच्या प्राचार्य व व्यवस्थापन प्रतिनिधी गटासाठीच्या एकुण १६ जागांसाठी भरण्यात आलेल्या अर्ज माघारीसाठी सोमवारी अंतीम मुदत होती. प्राचार्य गटाच्या १० जागांसाठी एकुण १२ अर्ज दाखल झाले होते. त्यापैैकी रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रभाकर भट यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला. १० जागांसाठी ११ उमेदवारांचे अर्ज दाखल होते. त्यामुळे ९ जागा बिनविरोध होणार हे निश्चित होते. तर महिला राखीव गटातुन एका उमेदवाराने माघार घेतल्यास या गटात देखील बिनविरोध होण्याची शक्यता होती.
भटक्या-विमुक्त प्रवर्गातील अर्ज बाद
सोमवारी छाननी अंती भटक्या व विमुक्त जागेसाठीचा एका जागेसाठी बाहेती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल लोहार यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला. त्यामुळे या जागेसाठी निवडणूक घेतली जाणार नसून ही एक जागा रिक्त राहणार आहे. खुल्या प्रवर्गातील ५, इतर मागासवर्गीय, एस.टी., व एस.सी प्रवर्गातील प्रत्येकी एका जागा बिनविरोध झाली आहे. मात्र महिला राखीव गटाच्या एका जागेसाठी कोणत्याही उमेदवाराने माघार घेतली नाही.त्यामुळे या एका जागेसाठी १७ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. महिला राखीव गटासाठी रायसोनी मॅनेजमेंटच्या प्र्राचार्या डॉ.प्रिती अग्रवाल व भुसावळ येथील नहाटा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मिनाक्षी वायकोळे यांच्यात लढत होणार आहे. याबाबतीत विद्यापीठाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रा.ए.बी.चौधरी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.
व्यवस्थापन परिषदेसाठी ८ उमेदवार
व्यवस्थापन परिषदेच्या सहा जागांसाठी उमेदवार रिंगणात असून महिला राखीव गटासाठी पुनम गुजराथी व दिपीका चौधरी यांच्यात लढत होणार आहे. खुल्या प्रवर्गातील ५ जागांसाठी ६ अर्ज उमेदवार रिंगणात आहेत.
प्राचार्य गटातील बिनविरोध झालेले उमेदवार
खुला प्रवर्ग
डॉ.एल.पी.देशमुख (नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव), डॉ.अशोक खैरनार (आदर्श कला महाविद्यालय, निजामपुर), डॉ.अशोक पाटील (विसरवाडी कला,वाणिज्य महाविद्यालय), डॉ.आर.एस.पाटील (शहादा कला,वाणिज्य,विज्ञान महाविद्यालय), डॉ.एस.एस.राणे (डॉ.जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव).
एस.सी.प्रवर्ग
डॉ.लता मोरे (सुरुपसिंग नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय,नवापुर)
इतर मागासवर्गिय प्रवर्ग
डॉ.ज्ञानेश्वर सुर्यवंशी , (विद्यावर्धिनी कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, धुळे))
एस.टी.प्रवर्ग
डॉ.नाना गायकवाड (रजनीताई नानासाहेब देशमुख महाविद्यालय,भडगाव)