१०० विद्यार्थ्यांनी केली सौरदिव्याची निर्मिती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 07:19 PM2019-10-02T19:19:07+5:302019-10-02T19:20:30+5:30
विद्यार्थी झाले सौरदूत : मू.जे. महाविद्यालय सौददिव्यांच्या प्रकाशाने उजळले
जळगाव- केसीईच्या अमृत महोत्सव व महात्मा गांधी जयंतीनिमित्त मू़जे़च्या पदार्थ विज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे गांधी ग्लोबल सोलर यात्रा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये तब्बल १०० विद्यार्थ्यांनी सौरदिव्यांची निर्मिती केली. त्यामुळे मू़जे़ महाविद्यालय सौरदिव्यांच्या प्रकाशाने उजळले होते.
सोलर मॅन म्हणून ओळख असलेले मुंबईचे प्रा़ चेतनसिहं सोलंकी यांच्या सोलर यात्रामध्ये बुधवारी लाखो विद्यार्थी सहभागी झाले़ त्यामध्ये मू़जे़च्या पदार्थ विज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या विद्यार्थ्यांनी सुध्दा सहभाग नोंदविला. या सौरदिवे निर्मितीच्या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ़ उदय कुळकर्णी यांच्या उपस्थितीत झाली़ नंतर पदार्थ विज्ञान विभागाचे विभाग प्रमुख डॉ. के.बी.महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी केसीईचे शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. जी. हुंडीवाले व स्वायत्त महाविद्यालयाचे समन्वक डॉ.स.ना.भारंबे यांची उपस्थिती होती़ तर डॉ. हेमंत गाजरे यांचे सौर ऊर्जा या विषयावर व्याख्यान पार पडले.
अन् विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकले आनंद
सोलर यात्रा हा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम बुधवारी १०१ देशांमध्ये एकाच वेळी आयोजित केला गेला. यात देश व विदेशातील सुमारे ३० लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला़ त्यामध्ये निर्मित झालेले असंख्य दिवेचमकले. या यात्रेचा उद्देश सौर उर्जेच्या वापरा विषयी समाजात जागरुकता निर्माण करून तिच्या वापराविषयी विशेष प्रयत्न करणे असा आहे़ या यात्रेत मू़जे़च्या १०० विद्यार्थी सहभागी होऊन त्यांनी सौर दिव्यांची जोडणी करून आपले कौशल्य सिद्ध केले. जोडणी नंतर हा दिवा घरी नेतांना विद्यार्थ्यांच्या चेहºयावर वेगळाच आनंद झळकून येत होता. या कार्यक्रमासाठी प्रा़ डॉ.मृणाल महाजन व प्रा़ डॉ.प्रतिभा निकम यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले.