८० टक्के शाळांनी पूर्ण केली गुणदानाचा टप्पा पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:11 AM2021-06-30T04:11:26+5:302021-06-30T04:11:26+5:30
जळगाव : शाळांनी इयत्ता दहावीचा निकाल राज्य शिक्षण मंडळाकडे सादर करण्याची तारीख जवळ येत आहे. जवळपास जळगाव जिल्ह्यातील ...
जळगाव : शाळांनी इयत्ता दहावीचा निकाल राज्य शिक्षण मंडळाकडे सादर करण्याची तारीख जवळ येत आहे. जवळपास जळगाव जिल्ह्यातील ८० टक्के शाळांनी गुणदानाची प्रक्रिया पूर्ण केली असून एक ते दोन दिवसात संपूर्ण प्रक्रिया शाळांची ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.जे. पाटील यांनी दिली. दरम्यान, गुण सादर करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे.
राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल वेळेत लावण्यासाठी सोपवण्यात आलेल्या कामकाजासाठी राज्यातील शिक्षक आणि मुख्याध्यापकांकडे बोटावर मोजण्या इतका कालावधी उरला आहे. या उरलेल्या दिवसांत विद्यार्थ्यांना देण्यात येणारे गुण, त्यासाठी मंडळाकडून आलेले संपूर्ण नियोजन पूर्ण करायचे आहे. तर त्यासाठी शिक्षकांनी त्यांना दिलेल्या वेळापत्रकानुसार कामकाज सुरू ठेवले आहे. त्यात अनेक तांत्रिक अडचणींचा सामना शिक्षकांना करावा लागला आहे.
वेळेत काम पूर्ण होण्यासाठी धावपऴ़़
- दरम्यान, शाळांनी त्यांच्या स्तरावर गुणांचे विभाजन करून सूत्रांमध्ये बसवण्याचे काम सुरू आहे. परंतु, मनुष्यबळाचा अभाव, याच काळात विद्यार्थ्यांचे आॅनलाइन वर्ग घेणे या सर्वांत वेळ जात आहे. त्यामुळे निकालाचे काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी शिक्षकांची धावपळ सुरू आहे़
- राज्यातील बहुतांश शाळांनी गुणदानासह इतर प्रक्रिया अद्याप पुर्ण केलेली नाही. त्यामुळे निकालाच्या कामासाठी मुदत देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
- यंदाचा निकाल कसा असेल याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून आहे. तसेच निकालाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण न केल्यास त्यास शाळा जबाबदार असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
-------
८० टक्के शाळांनी गुणदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे़ उर्वरित शाळांचे काम देखील लवकरचं पूर्ण होतील़ त्याबाबत सूचना देखील करण्यात आल्या आहेत़
- बी.जे.पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी
------
दहावी विद्यार्थी संख्या
जळगाव : ५८३१७
धुळे : २८९५५
नंदुरबार : २११८३
-------
दहावीचा निकाल तयार झाला आहे़ आता बोर्डाच्या संकेतस्थळावर गुण भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे निकाल तयार करण्यात आले आहे. त्यामुळे कुठलीही अडचण आली नाही.
- नारायण वाघ, शिक्षक