जिल्ह्यासाठी नवीन ८० व्हेंटिलेटर दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 12:33 PM2020-07-29T12:33:58+5:302020-07-29T12:34:45+5:30

कोरोनामुळे आरोग्य विभागाचा कायापालट : आणखी पाच व्हेंटीलर आज येणार

80 new ventilators introduced for the district | जिल्ह्यासाठी नवीन ८० व्हेंटिलेटर दाखल

जिल्ह्यासाठी नवीन ८० व्हेंटिलेटर दाखल

Next

जळगाव : गेल्या कित्येक वर्षांपासून केवळ ५७ व्हेंटिलेटरवर अवलंबून असलेल्या जिह्याच्या आरोग्य यंत्रणेसाठी आता एकाच वेळी तब्बल ८० व्हेंटिलेटर दाखल झाले आहेत. कोरोनाच्या संकटात या पूर्वी कोविड रुग्णालयात ७४ व्हेंटिलेटर उपलब्ध झालेले असून आता यात आणखी ८० व्हेंटिलेटरची भर पडली आहे. हे ८० व्हेंटिलेटर पीएम केअर योजनेतून ग्रामीण यंत्रणेसाठी प्राप्त झाले आहेत. या सोबतच तीन उपजिल्हा रुग्णालयात प्रत्येकी दहा बेडचा अतिदक्षता विभाग सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एऩ एस़ चव्हाण यांनी दिली.


वर्षानुवर्षे सुधारणेच्या प्रतीक्षेत असलेल्या आरोग्य यंत्रणेचा कोविडच्या काळात कायापालट होत असल्याचे गेल्या दोन महिन्यांपासूनचे चित्र आहे़ जिल्हा रुग्णालयात गेल्या कित्येक वर्षांपासून सहा व्हेंटीलेटर्स व एकच अतिदक्षता विभाग होता़ मात्र, आता या ठिकाणी ७४ व्हेंटिलेटर्स व चार अतिदक्षता विभाग सुरू झाले आहेत़ सर्व कक्ष अगदी चकाचक झाले असून रुग्णालयाला कॉर्पोरेट लूक आला आहे़ मनुष्यबळाचा मुद्दा मात्र, ऐरणीवर आहे़ ग्रामीण आरोग्य यंत्रणेतही सुधारणा होत असून जामनेर, चोपडा, मुक्ताईनगर या तीनही उपजिल्हा रुग्णालयात प्रत्येकी दहा बेडचे तसेच प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात प्रत्येकी २ बेडचा अतिदक्षता विभाग सुरू करण्यात येणार आहे़
अ‍ॅन्टीजन किट येणार
जिल्हाभरात अ‍ँंटीजन किटचा तुटवडा असून नुकत्याच तीन हजार किट प्राप्त झाल्या आहे़ शिवाय खासगी स्तरावरही आयसीएमआरच्या निर्देशानुसान एका खासगी कंपनीकडून ८ हजार किटची मागणी नोंदविण्यात आली आहे़ त्याही येत्या काही दिवसात उपलब्ध होणार आहेत़
आतपर्यंत १५, ५०० किट उपलब्ध झाल्या असून त्या माध्यमातून तातडीने तपासण्या करण्यात आल्या. सद्यस्थितीत आणखी किट उपलब्ध करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू असल्याचे डॉ़ चव्हाण यांनी सांगितले़

लोकसहभागाचे मोठे उदाहरण
जिल्ह्यात लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर आॅक्सिजन पाईपलाईनची कामे होणे हे राज्यात पहिलेच उदाहरण असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व स्तरातून ५० लाख ते १ कोटीपर्यंतची रक्कम जमवून आरोग्य यंत्रणा सृदृढ करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला आहे़ ग्रामीण भागात अनेक रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध झाल्याने रुग्णांची वणवण थांबत असल्याचे सकारात्मक चित्र जिल्ह्यात आहे.

एका रुग्णामागे वीस जणांची होणार तपासणी
जळगाव : त्रिसदस्यीय केंद्रीय समितीने दिलेल्या सूचनांनुसार आता जिल्हाभरात चाचण्या वाढविण्यात येणार असून लो रिस्क कॉण्टकची तपासणी करण्यात येणार असून एका रुग्णामागे वीस तपासण्या असे नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे़ अद्याप अनेक रुग्ण समोर येण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे़ मध्यंतरीच्या काळात तपासण्यांची संख्या कमी झाली होती़ एका रुग्णांमागे किमान पंधरा जणांच्या तपासण्या करण्याचे नियोजन होते, मात्र त्यावर ठोस अंमलबजावणी झालेली नव्हती़ पाच ते सात व्यक्तिंच्याच तपासण्या होत होत्या़ मात्र, जर मृत्यूदर कमी करायचा असेल तर लोकांमधून रुग्ण समोर येऊन त्यांचे निदान लवकर होणे अत्यावश्यक असल्याचे मत समितीनेही व्यक्त केले होते़ त्यानुसार जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणावर तपासण्या वाढविण्यात आल्या आहेत़ त्यात अधिक वाढविण्यात येणार आहे़ तपासण्या वाढविल्याने रुग्ण समोर आले व पुढचा संसर्ग शिवाय रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण आपण कमी करू शकलो, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ चव्हाण यांनी सांगितले

Web Title: 80 new ventilators introduced for the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.