जळगावात रोज 80 रुग्णांचा डेंग्यूचा अहवाल ‘पॉङिाटीव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 11:52 PM2017-09-24T23:52:46+5:302017-09-24T23:54:19+5:30

पॅथॉलॉजी लॅबचा अहवाल : 10 दिवसांपासून रुग्ण संख्येत दुपटीने वाढ

80 patients of Dengue report daily in Jalgaon | जळगावात रोज 80 रुग्णांचा डेंग्यूचा अहवाल ‘पॉङिाटीव्ह’

जळगावात रोज 80 रुग्णांचा डेंग्यूचा अहवाल ‘पॉङिाटीव्ह’

Next
ठळक मुद्देरक्त नमुने तपासणीत वाढस्वाइन फ्लूची कीट मुंबईलाटायफाईडचेही अहवाल पॉङिाटिव्ह

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 24 - शहरात डेंग्यू, स्वाइन फ्लू, चिकुन गुनियासारखे आजार वाढत असताना मनपा आरोग्य विभागाकडे केवळ ‘सदृश’ म्हणून रुग्णांची नोंद असली तरी खरी परिस्थिती पॅथॉलॉजी लॅबमधून समोर येत आहे. या ठिकाणी सध्या सर्वाधिक रक्त नमुने हे डेंग्यूच्याच तपासणीचे येत आहेत.  विशेष म्हणजे दररोज 70 ते 80 जणांचे नमुने पॉङिाटिव्ह येत असून गेल्या 8 ते 10 दिवसांपासून दुपटीने ही वाढ झाल्याचे चित्र आहे. 
 शहरात गेल्या महिनाभरापासून डेंग्यू व इतर आजारांनी  हातपाय पसरायला सुरुवात केली. त्यातच साचलेल्या पाण्याच्या डबक्यात डासांची उत्पत्ती होत आहे. डेंग्यू, चिकुन गुनिया, मलेरिया हे सर्व आजार डासांमुळे होतात. यात केवळ डेंग्यू हा स्वच्छ पाण्यातील डासांमुळे होतो.  

वाढत्या आजारामुळे शहरातील खाजगी दवाखाने फुल्ल आहेत. रक्त नमुने तपासणीचे प्रमाण वाढले आहे. तपासणीसाठी येणा:या रक्त नमुन्यांमध्ये जास्त प्रमाण डेंग्यूच्या तपासणीसाठीचे असल्याचे पॅथॉलॉजी लॅब चालकांचे म्हणणे आहे. केवळ डेंग्यूच्या चाचणीचेच प्रमाण जास्त आहे, असे नाही तर त्या तपासणी करण्यात येणा:या चाचण्यांमध्येही डेंग्यूचेच पॉङिाटिव्ह अहवालही जास्त आहे.  
दररोज 70 ते 80 रुग्ण
शहरातील एका पॅथॉलॉजी लॅबमध्ये येणा:या रक्त नमुन्यांच्या तपासणी अहवालामध्ये 8 ते 10 जणांचे अहवाल पॉङिाटिव्ह येत आहे. यामध्ये शहरातील एकूण 15 लॅबमधील ही सरासरी 70 ते 80 रुग्णांची असल्याचे जाणकारांनी सांगितले. 

शहरात पॅथॉलॉजी लॅबमध्ये डेंग्यू सोबतच स्वाइन फ्लू व चिकुन गुनियाच्या चाचणीसाठीही रक्त नमुने येत आहेत. मात्र डेंग्यूची ज्या प्रमाणे शहरातच तपासणी होते तशी स्वाइन फ्लूची होत नाही. त्यामुळे ही कीट मुंबई येथे पाठविण्यात येते. त्यामुळे हे प्रमाण वाढत असले तरी नेमका आकडा अस्पष्ट आहे. अशाच प्रकारे चिकुन गुनियाचे नमुने तपासणीची सोय सर्वच लॅबमध्ये नसल्याने याचाही संख्या उपलब्ध होत नाही. मात्र दररोज 10 ते 12 जण  चिकुन गुनियाचे दवाखान्यात येत असल्याचे  सांगितले जात आहे. 

डेंग्यू खालोखाल टायफाईडच्या रुग्णांचे प्रमाण असल्याचे अहवालावरून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शहरवासीयांनी दक्षता घेण्याचाच सल्ला दिला जातआहे.
 
शहरातील सर्वच भागाला विळखा
  शहरातील कोणत्या भागात रुग्णांचे प्रमाण अधिक आहे, या बाबत माहिती घेतली असता जवळपास सर्वच भागातून रुग्ण येत असल्याचे समोर आले. यामध्ये महाबळ कॉलनी परिसर, संभाजीनगर, मेहरूण, रामानंदनगर, आदर्शनगर, आयोध्यानगर, दौलतनगर, मोहननगर, वाघनगर, एकनाथनगर, भिकमचंद जैन नगर, नंदनवन कॉलनी, ङोड.पी. कॉलनी तसेच या परिसरातील रेल्वे मार्गानजीकचा भाग या ठिकाणी हे प्रमाण जास्त असल्याचे सांगण्यात आले. 

पालिकेत  8 फॉगिंग मशिन दाखल
शहरात साथ रोगांचा फैलाव सुरू असल्याने त्यावर उपाययोजना म्हणून प्रशासाने तातडीने 8 फॉगिंग (फवारणी) मशिन खरेदी केल्या आहेत.  त्याचा  शुभारंभ शनिवारी महापौर ललित कोल्हे यांच्याहस्ते करण्यात आला. या वेळी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, सुनील माळी, आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील, व्ही.एस. पांडे, डॉ. राम रावलाणी, प्रभाग अधिकारी उदय पाटील, अतिक्रमण निमरूलन विभागाचे अधीक्षक एच.एम. खान आदी उपस्थित  होते. 

Web Title: 80 patients of Dengue report daily in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.