चाळीसगाव तालुक्यातील मन्याड परिसरात ८० टक्के विहिरींनी गाठला तळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 06:23 PM2019-01-25T18:23:40+5:302019-01-25T18:24:24+5:30
बंद पंपांचे सर्वेक्षण करून तात्पुरते बिल बंद करण्याची शेतकऱ्यांची मागणी
आडगाव, जि. जळगाव : मन्याड परिसरात अत्यल्प पावसामुळे नदी, नाले, बंधारे कोरडे पडले असून मन्याड धरणातही पाणी नसल्याने परिसरातील ८० टक्के विहिरींनी तळ गाठला आहे. परिसरात पाणीच नसल्याने कृषी पंप बंद असतानाही शेतकºयांना वीज बिल भरावे लागत आहे. त्यामुळे महावितरणने सर्वेक्षण करून बिलाची योग्य आकारणी करावी, अशी मागणी शेतकºयांकडून केली जात आहे.
भू-जलपातळी खालावली
यावर्षी मन्याड परिसरात अत्यल्प पाऊस झाल्याने पावसाळा संपलयानंरही परिसरातील नदी, नाले, बंधारे, विहिरी कोरड्याच राहिल्याने तसेच मन्याड धरणदेखील कोरडेच आहे. त्यामुळे भू-जलपातळी खालावली असून परिसरातील जवळ-जवळ ८० टक्के विहिरींमध्ये पाणी नसल्याने त्यांनी तळ गाठला आहे.
विहिरींमध्ये पाणीच नसल्याने जवळपास सर्व कृषी पंप बंदच असल्याची स्थिती आहे. काही पंप आक्टोबर ,नोंव्हेबरपासूनच बंद झाले तर काही पंप डिसेंबर, जानेवारीमध्ये फक्त साठवूण ठेवलेल्या विहिरीच्या पाण्यातून गुरांना पाणी पिण्यासाठी हाळ भरण्याचेच काम करत आहेत. महावितरणने या सर्व पंपाचे सर्वेक्षण करून बिल आकारावे अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. अन्यथा बिलामुळे दुष्काळग्रस्त शेतकºयांना विनाकारण आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे.
२०१२मध्येही आक्टोबर, नोव्हेंबरपासून तर जून-जुलैपर्यंत जवळ जवळ ९ ते १० महिन्यांपर्यंत ५० टक्के शेतीपंप बंद असतानाही विज बिलाचा भूर्दंड शेतकºयांना सहन करावा लागला होता.
चाराही धोक्यात
मन्याड परिसरातील ज्या शेतकºयांच्या विहिरींना थोडेफार पाणी होते अशा शेतकºयांनी पशुधन जगविण्यासाठी चारा पिक म्हणून दादर, मक्याची लागवड केली होती. परंतु विहिरींच्या जलपातळीत दिवसेंदिवस कमालीची घट झाल्याने सदर पिके करपून गेली आहेत. चारा, पाण्याअभावी पशुधन जगविण्यासाठी शेतकºयांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. येणारा उन्हाळा शेतकºयांसाठी कसोटीचाच ठरणार असल्याचे चित्र आहे.
रब्बी हंगाम गायब
संपूर्ण परिीसरात यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने विहिरी, नदी, नाले, बंधारे वाहून निघालेच नाही. त्यामुळे जमिनीत पाणी न मुरल्याने भूजलपातळी वाढलीच नाही. पाटाला व विहिरींना पाणीच नसल्याने रब्बीचा पेरा शेतकºयांना करता आला नाही. त्यामुळे परिसरात कुठेही गहू, हरबरा, भुईमूंग, सोयाबीनची पेरणी झालेली नाही. खरीपासह रब्बीचाही फटका बसल्याने मन्याड परिसरातील शेतकरी हवालदिली झाला आहे.
चारा छावण्या उभाराव्या
मन्याड परिसरात पाण्याची व चाºयाची बिकट परिस्थिती उद््भवल्याने या दोंन्ही गोष्टी विकतही मिळणे कठीण झाले आहे. जमिनीत पाणी नसल्याने नवीन विहिर किंवा कुपनलिका करूनदेखील उपयोग होत नाही. मग पाणी मिळणार तरी कुठून असा प्रश्न शेतकºयांपुढे उभा आहे. दुसरीकडे परिसरात किंवा दुसºया तालुक्यात ज्यांच्याकडे चारा होता त्याने आधीच विकून टाकल्याने नवीन चारा पैसे देऊनही मिळत नाही. त्यामुळे शासनाने परिसरात लवकरात लवकर चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी होत आहे.
फळ पिक वाचविण्यासाठी लाखो रुपये पाण्यात
मन्याड परिसरात बहुतेक शेतकºयांनी पिक पध्दत बदल म्हणून कुणी डाळींब, लिंबू, पपई, मोसंबी यांची लागवड केली आहे. मात्र पाणीच नसल्याने काही शेतकºयांनी फळांची झाडे उपटून फेकले तर काही शेतकºयांनी डाळींबाचा बहर पाहता पाणी अपूरे पडू लागल्याने कुणी टँंकरने तर कुणी पाईपलाईन करून लाखो रुपये खर्च करून बाग जगविण्यासाठी धडपड करीत आहेत.
पुढे काय ?
भीषण दुष्काळाला सामोरे जाताना शेतकरी मेटाकुटीस आला असून त्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे.