जळगावातील आगग्रस्तांना 80 हजारांचे धनादेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 12:24 PM2018-02-03T12:24:11+5:302018-02-03T12:27:06+5:30

19 घरात होता रहिवास 

80 thousand check for Jalgaon firefighters | जळगावातील आगग्रस्तांना 80 हजारांचे धनादेश

जळगावातील आगग्रस्तांना 80 हजारांचे धनादेश

Next
ठळक मुद्देदारिद्रय़ रेषेखालील रहिवाशांची माहिती  घेतली जाणार प्रति व्यक्ती एक हजार रुपये

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 3-  जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह मान्यवरांच्याहस्ते 80 हजार रुपयांचे धनादेश वितरीत करण्यात आले. या वेळी गिरीश महाजन यांनी घरांची पाहणी करून आगग्रस्तांना धीर दिला.  पंचनाम्यानुसार या ठिकाणी एकूण 22 घरे होती. यातील एक अंगणवाडी असून दोन घरे रिकामी होती. उर्वरित 19 घरात रहिवास होता. या घरांचे नुकसान झाल्याने त्यांना शुक्रवारी सानुग्रह अनुदानाचे वाटप करण्यात आले. यामध्ये प्रति व्यक्ती एक हजार रुपये अथवा एका कुटुंबास जास्तीत जास्त पाच हजार रुपयांचे प्रशासनाच्यावतीने  एकूण 80 हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.  

दारिद्रय़ रेषेखालील रहिवाशांची माहिती  घेतली जाणार 
आगीच्या घटनेनंतर अनेक रहिवाशांनी आपल्या व्यथा मांडल्या. यामध्ये काही रहिवाशांनी व्यवसायासाठी लागणारा लाखो रुपयांचा माल खरेदी केलेला होता, कोणाच्या घरात बांधकाम तसेच वेगवेगळ्य़ा कामानिमित्त आणलेली रक्कम ठेवलेली असल्याचे म्हणणे आहे. तसेच अनेकांचे दारिद्रय़ रेषेखालील कार्ड तसेच स्वस्त धान्य दुकानांचे पिवळे कार्ड जळून खाक झाल्याचे म्हणणे आहे. यामध्ये दारिद्रय़ रेषेखालील कुटुंब म्हणून कोणाची नोंद आहे, याची माहिती महापालिकेकडून घेतली जाणार आहे. 

Web Title: 80 thousand check for Jalgaon firefighters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.