जळगावातील ८०० विद्यार्थिनी पाहणार ‘पॅडमॅन’ चित्रपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 07:32 PM2018-04-10T19:32:12+5:302018-04-10T19:32:12+5:30
मुलींमध्ये सॅनिटरी नॅपकिन्सच्या वापराबाबत जागृती व्हावी, या उद्देशाने जिल्हा परिषद व भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन व अनुभूती स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने १३ रोजी सकाळी ११ ते २ या वेळात कांताई हॉल येथे शहरातील ८०० किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी पॅडमॅन चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे़
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.१० - मुलींमध्ये सॅनिटरी नॅपकिन्सच्या वापराबाबत जागृती व्हावी, या उद्देशाने जिल्हा परिषद व भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन व अनुभूती स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने १३ रोजी सकाळी ११ ते २ या वेळात कांताई हॉल येथे शहरातील ८०० किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी पॅडमॅन चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे़
राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने अस्मिता योजना राबविण्यात येत आहे़ या अंतर्गत किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स पुरविण्यात येते़ याबाबत मुलींमध्ये जागृती होऊन त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवा यासाठी जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता ८ वी ते १० वीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलींना पॅडमॅन हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे शहरातील १० शाळांची निवड करण्यात आली आहे़
या शाळांचा आहे समावेश
ला़ना़ सार्वजनिक विद्यालय, नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय, पुष्पावती खुशाल गुळवे विद्यालय, प़ऩ लुंकड कन्याशाळा, जि़प़ विद्यानिकेतन विद्यालय, आऱआऱ विद्यालय, भाऊसाहेब राऊत विद्यालय, नूतन मराठा विद्यालय, अँग्लो उर्दू हायस्कूल, इकरा हायस्कूल या १० विद्यालयांचा समावेश असून या विद्यालयांमधील विद्यार्थीनींना चित्रपट दाखविण्यात येणार आहे़