81 वर्षाची ब्रिटनची ऑस्टीन आजही धावतेय रस्त्यावर

By admin | Published: April 11, 2017 01:34 PM2017-04-11T13:34:18+5:302017-04-11T13:34:18+5:30

भुसावळात तब्बल 81 वर्ष जुनी असलेली ब्रिटनची ऑस्टीन- 7 आजही भुसावळच्या रस्त्यावर दिमाखात धावतांना दिसत़े

The 81-year-old Britain's Austin still runs on the road | 81 वर्षाची ब्रिटनची ऑस्टीन आजही धावतेय रस्त्यावर

81 वर्षाची ब्रिटनची ऑस्टीन आजही धावतेय रस्त्यावर

Next

 ऑनलाईन लोकमत/गणेश वाघ  

भुसावळ, दि.11- ब्रिटीशकालिन राजवटीतील पूल, इमारती आजही  दिमाखात उभे असून हा ठेवा आजही टिकून आहे. तसाच ठेवा वाहनाच्या रूपात भुसावळातील डॉ़खानापूरकर दाम्पत्याने जपला आह़े तब्बल 81 वर्ष जुनी असलेली ब्रिटनची ऑस्टीन- 7 आजही भुसावळच्या रस्त्यावर दिमाखात धावतांना दिसत़े ही गाडी रस्त्यावर निघाल्यानंतर जाणा:या-येणा:यांच्या नजरा आपोआप तिच्यावर खिळतात़
तीन पिढय़ांचा अमूल्य ठेवा
भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील डॉ़मंगेश खानापूरकर यांचे आजोबा दत्तात्रय गंगाधर खानापूरकर यांनी 7 फेब्रुवारी 1936 मध्ये त्यांच्याकडील जुनी चारचाकी गाडी एक्सचेंज केली व दोन हजार रुपये जादा देऊन ब्रिटन येथून ऑस्टीन- 7 विकत घेतली होती़ पेट्रोलवर चालणारी ही ऑस्टिन सेव्हन पर्ल कॅबिनेट एम़क़ेवऩ या प्रकारातील सलून कार आहे. 
दत्तात्रय खानापूर यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव मनोहर दत्तात्रय खानापूरकर व आता डॉ़मंगेश खानापूरकर यांनी तीन पिढय़ांचा अमूल्य ठेवा जपला आह़े खानापूरकर परिवाराकडे नव्या तंत्रज्ञानातील आधूनिक वाहने आल्यानंतर त्यांनी आजोबांनी घेतलेला अमूल्य ठेवा अद्यापही जपून ठेवला आह़े 
81 वर्षानंतर ठेवा सुस्थितीत
ग्रेट ब्रिटनहून आणलेली ऑस्टीन- 7 आजही 81 वर्षानंतरही सुस्थितीत आह़े पेट्रोल इंजिन असलेली ही गाडी सेल्फ स्टार्ट तसेच हॅण्डलवरही लागलीच सुरू होत़े सुमारे 630 किलो वजनाचे ऑस्टीन चार सिलेंडरची असून तिचा चेसीस नंबर 233/94 तर इंजिन नंबर 235942 असा आहे. गाडीचा नंबर बीवायएन 522 असा आहे. या गाडीत आजही फ्युएल मीटर, स्पीडो मीटर, अॅम्पीअर मीटर, साईड इंडीकेटर, वायफर सुरू आह़े या गाडीत हॅशबॅक सिस्टीम आहे.
लंडनहून येथून येतात सुटे भाग
ऑस्टीन- 7 चे उत्पादन बंद झाले असलेतरी लंडन येथील काही कंपन्या अद्यापही ऑस्टीन- 7 चे सुटे भाग बनवून देतात, असे डॉ़मंगेश खानापूरकर यांनी सांगितल़े ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर सुटे भाग मिळतात, असे सांगत ते म्हणाले की, 1975 मध्ये गाडीचे नूतनीकरण (रिपेंट व बॉडीचे) करण्यात आल्याचे त्यांनी सांगितल़े सुमारे सहा वर्षापूर्वी मुलगी पूर्वीच्या लगAासाठी ही गाडी सजवण्यात आली होती़ वरातीत ही गाडी सहभागी झाल्यानंतर सर्वाच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली होती़
अशी आहेत ऑस्टीन सेवनची वैशिष्टय़े 
सेल्फ स्टार्ट तसेच हॅण्डल मारून गाडी सुरू करण्याची सुविधा
630 किलो वजन, चार सिलिंडर व पेट्रोल इंजिन
800 सीसी इंजिन 4630 किलो वजन व चार प्रवासी आसन क्षमता
प्रति लीटर 10 किलोमीटर अॅव्हरेज व कमाल तासी वेग 60 कि़मी़

Web Title: The 81-year-old Britain's Austin still runs on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.