जळगाव जिल्ह्याचा इयत्ता १२ वीचा ८४.२० टक्के निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 02:38 PM2018-05-30T14:38:53+5:302018-05-30T14:38:53+5:30

खान्देशात धुळे जिल्ह्याने ८८.८७ टक्के निकाल कायम राखत पहिला तर नंदुरबारने ८४.७० टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी राहिला आहे. जळगाव जिल्हा ८४.२० टक्क्यांसह तिसºया स्थानावर आहे.

84.20 percent of Class 12 V of Jalgaon district results | जळगाव जिल्ह्याचा इयत्ता १२ वीचा ८४.२० टक्के निकाल

जळगाव जिल्ह्याचा इयत्ता १२ वीचा ८४.२० टक्के निकाल

Next
ठळक मुद्देएक लाख ४० हजार ८२४ विद्यार्थ्यांनी दिली होती १२ वीची परीक्षाजळगाव जिल्ह्यातील ४१ हजार २७९ विद्यार्थी १२ वी परीक्षेत उत्तीर्ण१२ जून रोजी मिळणार महाविद्यालयात गुणपत्रक

आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.३० : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणेतर्फे इयत्ता १२ वीचा निकाल बुधवार ३० रोजी घोषित करण्यात आला. खान्देशात धुळे जिल्ह्याने ८८.८७ टक्के निकाल कायम राखत पहिला तर नंदुरबारने ८४.७० टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी राहिला आहे. जळगाव जिल्हा ८४.२० टक्क्यांसह तिसºया स्थानावर आहे. नाशिक विभागातील ९८७ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची २१८ केंद्रांवर इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली होती.
नाशिक विभागीय मंडळातर्फे फेब्रुवारी महिन्यात इयत्ता १२ वीची परीक्षा घेण्यात आली होती. नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील एक लाख ४० हजार ८२४ विद्यार्थ्यांनी १२ वीची परीक्षा दिली होती.

जळगाव जिल्ह्यातील २८५ महाविद्यालयातील ७१ केंद्रांवर परीक्षा
इयत्ता १२ वीच्या परीक्षेसाठी जळगाव जिल्ह्यातील २८५ महाविद्यालयातील ४९ हजार २७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. ७१ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी ४१ हजार २७९ या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

धुळे व नंदुरबारची आघाडी
धुळे जिल्ह्यातील १९७ महाविद्यालयातील २४ हजार ७३४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील २१ हजार ९८० विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील १११ महाविद्यालयातील १६ हजार २३१ विद्यार्थी परीक्षेसाठी बसलेले होते. त्यातील १३ हजार ७४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. धुळे जिल्ह्याची निकालाची टक्केवारी ८८.८७ तर नंदुरबार जिल्ह्याची ८४.७० टक्के आहे.

नाशिक विभागाचा निकाल ८६.१३ टक्के
इयत्ता १२ वी परीक्षेसाठी नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या चार जिल्ह्यातून १ लाख ६० हजार २८४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातील एक लाख ३८ हजार ५५ विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. नाशिक विभागाच्या निकालाची टक्केवारी ८६.१३ टक्के आहे.

Web Title: 84.20 percent of Class 12 V of Jalgaon district results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव