आधार-शिधापत्रिका लिंकिंगचे ८५ टक्के काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:40 AM2021-01-13T04:40:22+5:302021-01-13T04:40:22+5:30

जळगाव : वन नेशन वन रेशन कार्ड उपक्रमाअंतर्गत शिधापत्रिकेशी आधार कार्ड लिंक केले जात असून जिल्ह्यात २३ लाख ६८ ...

85% work of Aadhaar-ration card linking completed | आधार-शिधापत्रिका लिंकिंगचे ८५ टक्के काम पूर्ण

आधार-शिधापत्रिका लिंकिंगचे ८५ टक्के काम पूर्ण

Next

जळगाव : वन नेशन वन रेशन कार्ड उपक्रमाअंतर्गत शिधापत्रिकेशी आधार कार्ड लिंक केले जात असून जिल्ह्यात २३ लाख ६८ हजार ७६ लाभार्थ्यांचे रेशन कार्ड व आधार लिंकिंग झाले आहे. ८५ टक्के हे काम झाले असून शिधापत्रिकेतील किमान एका सदस्याचे तरी आधार लिंक झाल्याचे प्रमाण ९८ टक्क्यांच्या पुढे गेले आहे. ४ लाख ४३ हजार १७६ लाभार्थ्यांचे आधार संलग्न करणे बाकी आहे. ३१ जानेवारी पर्यंत सर्व शिधापत्रिका आधार कार्डाशी संलग्न करावयाचे असल्याने सुटीच्या दिवशीही स्वस्त धान्य दुकान सुरू ठेवावीत असे आदेश सर्व रेशन दुकानदारांना देण्यात आले आहेत.

सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये वन नेशन वन रेशन कार्ड योजनेअंतर्गत आपल्या रेशन कार्ड द्वारे कुठूनही धान्य खरेदी करता येणार आहे. यासाठी रेशन कार्डशी आधार कार्ड जोडणे आवश्यक करण्यात आले आहे.

कोरोनामुळे अडथळा

या योजनेसाठी जिल्ह्यात शिधापत्रिका व आधार कार्ड लिंक करण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र मार्च महिन्यापासून कोरोना स्थितीमुळे या लिंकिंगमध्ये अडथळे निर्माण झाले. आधार क्रमांक लिंक करताना लाभार्थ्याचे ठसे घ्यावे लागत असल्याने संसर्ग होऊ नये म्हणून हे काम थांबविण्यात आले होते. परिणामी सर्व आधार कार्डचे शिधापत्रिका लिंक होऊ शकल्या नाही. सप्टेंबर महिन्यापासून हे काम पुन्हा सुरू करण्यात आले असून जिल्ह्यातील एकूण २८ लाख ११ हजार २५२ लाभार्थीपैकी २३ लाख ६८ हजार ७६ लाभार्थ्यांचे लाभार्थ्यांचे आधार क्रमांक शिधापत्रिकेची लिंक झालेले आहे. हे प्रमाण जवळपास ८५ टक्के असून शिधापत्रिकेतील किमान एका सदस्याचे तरी आधार लिंक केलेल्या शिधापत्रिकांची संख्या पाच लाख ९० हजार ७१७ पर्यंत पोहोचली असून ९८ टक्के हे काम झाले आहे.

अंत्योदय, प्राधान्य कुटुंब योजनेच्या शिधापत्रिकेतील ज्या लाभार्थ्यांची आधार क्रमांक, मोबाईल सिडींग अद्याप झालेली नाही केवळ अशाच लाभार्थ्याचे आधार क्रमांक, मोबाईल सिडींग करून घेतले जात असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी दिली.

आधार लिंकिंगचे काम सुरूच असून स्वस्त धान्य दुकानदार यांचे तसे घेऊन आधार लिंक केले जात आहे. हे काम ८५ टक्के झाले असून ते लवकरच पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

आधार लिंकिंगची स्थिती

अंत्योदय, प्राधान्य कुटूंब योजनेच्या शिधापत्रिका - ६ लाख ९ हजार ९२२

एकूण लाभार्थी - २८ लाख ११ हजार २५२

आधार संलग्न लाभार्थी - २३ लाख ६८ हजार ७६ लाभार्थी

आधार संलग्न बाकी - ४ लाख ४३ हजार १७६

Web Title: 85% work of Aadhaar-ration card linking completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.