आदिवासी विद्यार्थी शिष्यवृत्तीचे ८६ लाख जिल्हा बॅँकेत पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 12:32 PM2017-08-21T12:32:44+5:302017-08-21T12:34:40+5:30
जिल्हा परिषदेने पाच महिन्यांपूर्वीच बॅँकेकडे वर्ग केली रक्कम
ठळक मुद्देजिल्ह्यात लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या ६ हजार ४२१जि.प.ने बँक खातेक्रमांकासह दिली यादीपाच महिन्यांपासून बॅँकेने रक्कम स्वत:कडेच ठेवल्याने आश्चर्य
आ नलाईन लोकमत कळमसरे, ता.अमळनेर, दि...२१ : आदिवासी मुला-मुलींना मिळणारी सुवर्ण महोत्सवी मॅट्रीकपूर्व आदिवासी शिष्यवृत्तीची तब्बल ८६ लाखाची रक्कम जिल्हा बॅँकेकडे पडून असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे जळगाव जिल्हा परिषदेने मार्च २०१७ मध्येच ही रक्कम जिल्हा बॅँकेकडे धनादेशाद्वारे वर्ग केली आहे.पाच महिने उलटून देखील जिल्हा बॅँकेने लाभार्थी विद्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग केलेली नाही.कळमसरे हायस्कुलने अमळनेर पंचायत समिती, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल, प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय, जळगाव अशी टप्याटप्याने सखोल चौकशी केली असता, जिल्हा परिषदेने जिल्हा बॅँकेच्या मुख्यालयाकडे ही रक्कम ३१ मार्च २०१७ पूर्वीच पाठविल्याचे निदर्शनास आले. पाचवी ते दहावीपर्यंतच्या अदिवासी मुला-मुलींना सुवर्ण महोत्सवी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी जिल्ह्यातील ६ हजार ४२१ लाभार्थी विद्यार्थी संख्या असून, त्यांची ८६ लाख ३१ हजार ५०० रूपयांची शिष्यवृत्तीची रक्कम जिल्हा बॅँकेच्या मुख्य कार्यालयात जमा करण्यात आलेली आहे. बॅँक खाते क्रमांकासह लाभार्थी विद्यार्थ्यांची नावानिशी यादी सोबत देऊनही अजुन विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा झालेली नाही.जिल्हा बॅँकेचे संपूर्ण कामकाज आॅनलाईन होते. तरी देखील पाच महिन्यांपर्यंत शिष्यवृत्तीची ८६ लाखांची रक्कम जिल्हा बॅँकेने स्वत:जवळच ठेवल्याने, आश्चर्य व्यक्त होत आहे. पाचवी ते सातवीपर्यंतच्या अनुसूचित जमातीच्या मुला-मुलीला १५०० रूपये तर आठवी ते दहावीच्या अनु.जमाती मुले-मुलींना २००० रूपयांप्रमाणे शिष्यवृत्तीची रक्कम परस्पर विद्यार्थ्यांच्या बॅँक खात्यावर जमा होत असते. याबाबत जिल्हा बॅँकेच्या बॅँकीग शाखा व्यवस्थापकाशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, यासाठी २१ प्रस्ताव आले आहेत. आतापर्यंत आतापर्यंत फक्त सहा प्रस्ताव निकाली काढण्यात आले आहे. या रक्कमा विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केल्या आहेत. अजुन १५ प्रस्ताव बाकी असल्याचे सांगण्यात आले. शिष्यवत्ती रक्कम शाळा देत नसल्याचा पालकांचा शाळाविषयी रोष व्यक्त होत आहे. चौकशी करणार : खेवलकरया संदर्भात चौकशी केली जाईल. तसेच विद्यार्थ्यांना लवकरात लवकर त्यांची रक्कम देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षा रोहिणी खेवलकर यांनी सांगितले.