आयटीआयच्या २१ ट्रेडसाठी ८६४ जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 08:58 PM2019-06-13T20:58:59+5:302019-06-13T21:08:49+5:30
प्रवेश प्रक्रिया सुरू : प्रवेश अर्ज निश्चितीसाठी विद्यार्थ्यांची झुंबड
जळगाव- शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले असून त्यानुसार प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे़ आयटीआय प्रवेश यंदाही आॅनलाइन पद्धतीने होत असून अर्ज करण्यासाठी ३ जून ते ३० जून अशी मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक माहितीपुस्तिका वाचून आॅनलाइन अर्ज भरावेत, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयकडून देण्यात आली. दरम्यान, यंदा आयटीआयच्या २१ ट्रेडमधील ८६४ जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
कसा करावा अर्ज
राज्यातील सर्व आयटीआय संस्था हे प्रवेश अर्ज स्वीकृती केंद्र असतील. तेथून प्रवेशाची माहितीपुस्तिका प्राप्त करू शकतील. आॅनलाइन अर्ज ३ जून रोजी सकाळी ११ वाजल्यापासून संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत़ आॅनलाइन अर्जात प्राथमिक माहिती भरल्यानंतर उमेदवारांचे प्रवेश खाते, त्याचा नोंदणी क्रमांक हाच युजर आयडी म्हणून तयार होईल. अर्ज भरल्यानंतर तात्पुरत्या प्रवेश अर्जाची छापील प्रत घ्यावी व प्रवेश अर्ज निश्चित करावा. प्रवेश अर्ज व प्रवेश निश्चितीसाठी प्रमाणपत्रे आयटीआय संस्थेत सादर करावीत. त्यानंतर कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर अर्ज निश्चितीकरण पावती व निश्चिती केलेल्या प्रवेश अर्जाची प्रत संस्थेमार्फत देण्यात येतील. त्यानंतरच अर्जाची फेरीसाठी विचार करण्यात येईल.
जास्त अर्ज निश्चित केल्यास अर्ज होईल रद्द
उमेदवाराने एकच अर्ज निश्चित करावा, अशा सूचना आहेत़ दरम्यान, एकापेक्षा जास्त अर्ज निश्चित केल्यास त्या उमेदवाराचे सर्व अर्ज रद्द होतील, असेही आयटीआयकडून कळविण्यात आले आहे. जर अशा उमेदवाराची निवड झाल्यास वा चुकीने प्रवशे देण्यात आला असल्याच त्याचा प्रवेश रद्द करण्यात येईल व उमेदवारा संपूर्ण प्रक्रियेतून बाद होईल. यामुळे एकच अर्ज निश्चित करण्याचे आवाहन केले आहे. तसेच अनिवासी भारतीय व इतर राज्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांनी ३ जुनपासून आॅनलाइन प्रवेश अर्ज व चौथ्या फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
असे आहेत प्रवेश अर्ज शुल्क
- अराखीव प्रवर्ग उमेदवार --- १५० रूपये
- राखीव प्रवर्ग उमेदवार --- १०० रूपये
- महाराष्ट्र राज्याबाहेर उमेदवार --- ३०० रूपये
- अनिवासी भारतीय उमेवार --- ५०० रूपये
आयटीआय प्रवेश वेळापत्रक
आॅनलाइन अर्ज करणे :- १ ते ३० जून
प्रवेश अर्ज निश्चित करणे :- ६ जून ते १ जुलै
पहिल्या प्रवेश फेरीसाठी विकल्प व प्राधान्यक्रम भरणे :- ६ जून ते १ जुलै
प्राथमिक गुणवत्ता यादी :- ४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता़
गुणवत्ता यादीवर हरकती नोंदविणे :- ४ ते ५ जुलै
अंतिम गुणवत्ता यादी :- ९ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता़
पहिली प्रवेश फेरी :- ११ जुलै ते १५ जुलै
दुसरी प्रवेश फेरी :- १२ ते १६ जुलै
तिसरी प्रवेश फेरी :- २१ ते २५ जुलै
चौथी प्रवेश फेरी :- ३१ जुलै ते ३ आॅगस्ट
समुपदेशन फेरी :- १२ आॅगस्ट, सायंकाळी ५ वाजता
पुन्हा अर्ज करता येणार
मुदतीच्या आत प्रवेश अर्ज सादर करू न शकलेल्या उमेदवारांना समुपदेशन फेरीत संधी उपलब्ध करून देण्यासाठी आॅनलाइन पध्दतीने प्रवेश अर्ज भरता येणार आहे़ नंतर अर्जांची दुरूस्ती, प्रवेश अर्ज पुणृ भरल्यानंतर अर्जाची छापिल प्रत घेणे, अर्ज स्विकृती केंद्रात मुळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर प्रवेश अर्ज शुल्क भरून अर्ज निश्चत करता येणार आहे़ ही प्रक्रिया २२ जुलैपासून तर १० आॅगस्टपर्यंत राबविण्यात येणार आहे़
ट्रेडचे नाव जागा
कॉम्प्युटर आॅपरेटर प्रोग्रामिंग ४८
सुतारकाम २४
फॉन्ड्रीमॅन २०
ट्रॅक्टर मॅकेनिक २०
पंप आॅप्रेटर कम मॅकेनिक २०
संधाता ८०
मॅकेनिक डिझेल ४०
प्लॅस्टिक प्रोसेसिंग आॅपरेटर ४०
यंत्र कारागिर ८०
यंत्र कारागिर घर्षक ४८
जोडारी ८०
कातारी ४८
विजतंत्री ८०
तारतंत्री २०
रेफ्रीजीरेटर अॅण्ड एअर कंडीशनर २४
यांत्रिक मोटार गाडी ४०
ईलेक्ट्रानिक्स मेके ़ ४८
मॅकेनिक मश्नि टुल मेटन्स ४०
यांत्रिक आरेखक २०
टुल अॅण्ड आयमेकर २०
इस्टुमेंन्ट मॅकेनिक २४
---------------------------------------------
एकूण ट्रेड २१ जागा- ८६४