जिल्ह्यात गेल्या बारा दिवसात ८८ कोरोना रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 12:04 PM2020-07-04T12:04:56+5:302020-07-04T12:06:25+5:30
सर्वात बिकट स्थिती : मृत्यू रोखणे आताही प्रशासनासमोर मोठे आव्हान, दिवसाला सरासरी होतात सात जणांचे मृत्यू
आनंद सुरवाडे ।
जळगाव : कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखणे हे तीन महिन्यानंतरही सर्वात मोठे आव्हान प्रशासनासमोर कायमच आहे़ हे नियमित होणारे मृत्यू व आठवडाभरानंतर वाढलेली आकडेवारी यावरून समोर येत आहे़
कोरोना संक्रमणातील सर्वाधिक कठीण गेलेल्या जून महिन्याच्या शेवटचे दहा दिवस व जुलैचे दोन अशा बारा दिवसात ८८ जणांचे मृत्यू झाले आहेत़ या मृत्यूचे विश्लेषण केले असता सरासरी दिवसाला ७ ते ८ रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे अत्यंत गंभीर चित्र समोर येत आहे़
रुग्णसंख्या वाढल्यामुळे मृत्यूदर कमी होत असल्याचा दावा जरी प्रशासनाकडून केला जात असला तरी रोज होणारे मृत्यूचे प्रमाण, मात्र, कुठेही कमी होताना दिसत नसल्याचे गंभीर चित्र आहे़
बाहेर होणारे मृत्यूही चिंताजनक
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १८९
उल्हास पाटील रुग्णालय २८
गणपती रुग्णालय ५
गोल्डसिटी रुग्णालय १
पाचोरा सीसीसी ३
चोपडा सीसीसी २
अमळनेर सीसीसी २
चाळीसगाव सीसीसी १
चाळीसगाव १
१५ रुग्ण मृतावस्थेत दाखल झाले होते
(सीसीसी- कोविड केअर सेंटर)
अशा उपायोजना
-१९० बेडच्या आॅक्सिजन पाईपलाईनचे काम पूर्ण.
-५० बेडचे काम प्रगतीपथावर
-७० बेडवर जम्बो सिलिंडरद्वारा आॅक्सिजनचा पुरवठा होणार आहे़
-३११ बेडवरआॅक्सिजनची सुविधा असेल
-४० बेडचे ४ आयसीयू आहेत
-३५ व्हेंटीलेटर्स आलेले आहेत