आरटीपीसीआर अहवालात ९ टक्के बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:38 AM2021-01-13T04:38:01+5:302021-01-13T04:38:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या महिन्यात २ टक्क्यांवर गेलेले बाधितांचे प्रमाण आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ९ टक्क्यांवर आल्याने चिंता वाढली ...

9 per cent affected in RTPCR report | आरटीपीसीआर अहवालात ९ टक्के बाधित

आरटीपीसीआर अहवालात ९ टक्के बाधित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या महिन्यात २ टक्क्यांवर गेलेले बाधितांचे प्रमाण आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ९ टक्क्यांवर आल्याने चिंता वाढली आहे.

जिल्ह्यात ५७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी ४६६ आरटीपीसीआर अहवालंमध्ये ४२ बाधित आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णवाढ समोर येत असून महिनाभरात हा आलेख वाढला आहे. यात शहरात अधिक रुग्ण समोर येत आहेत. ५७ रुग्णांमध्ये शहरातील वीस रुग्णांचा समावेश आहे. सोमवारी चोपडा येथील एका ६० वर्षीय बाधित पुरूषाच्या मृत्यूची नोंद आहे.२१९ ॲन्टीजन तपासण्या झाल्या यात १५ बाधित आढळून आले तर आरटीपीसीआर अहवालांमध्ये ४२ बाधित आढळून आले आहे.शहरातील सर्व रुग्ण हे आरटीपीसीआर अहवालातील आहेत. सोमवारी ४९ रुग्णांना घरी सोडण्यात आले.

Web Title: 9 per cent affected in RTPCR report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.