सारीचे ९ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:16 AM2021-05-14T04:16:53+5:302021-05-14T04:16:53+5:30

२३ अहवाल प्रलंबित जळगाव : आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले असून यामुळे प्रलंबित अहवालांची संख्या वाढविण्यात आली आहे. ही ...

9 deaths of Sari | सारीचे ९ मृत्यू

सारीचे ९ मृत्यू

Next

२३ अहवाल प्रलंबित

जळगाव : आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले असून यामुळे प्रलंबित अहवालांची संख्या वाढविण्यात आली आहे. ही संख्या २३६८ वर पोहोचली आहे. यासह काही कारणास्तव स्पष्ट न झालेल्या अहवालांची संख्या १७७५ वर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्यात आल्या आहे.

सीसीसीत ६६९ रुग्ण

जळगाव : कोविड केअर सेंटरमध्ये सद्यस्थितीत ६६९ रुग्ण उपचार घेत आहेत. लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जाते. यातील अधिक रुग्ण हे जळगाव शहरातील आहेत. जळगाव शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये १६०० रुग्णांची व्यवस्था आहे.

गर्दीवर नियंत्रण

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नातेवाईकांना बंदी असल्याने गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. नातेवाईकांना वेळेनुसारच आत सोडले जात असून संसर्ग रोखण्यासाठी हे कडक पावले उचलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. महिनाभरापूर्वी रुग्णालय परिसरात प्रचंड गर्दी होत होती.

खड्ड बुजणार कधी

जळगाव : अजिंठा चौफुली या अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या अगदी मधाेमध एक भला मोठा खड्डा पडला असून हा खड्डा अपघाताला निमंत्रण देणार आहे. मात्र, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असून यामुळे मोठ्या अपघाताची भीती असल्याने हा खड्ड बुजणार कधी असा प्रश्न वाहनधारकांमधून समोर येत आहे.

Web Title: 9 deaths of Sari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.