पाळधीजवळ कापसाचा ट्रक उलटून मुकटीचे ९ मजूर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 22:27 IST2018-04-24T22:27:01+5:302018-04-24T22:27:01+5:30
जळगाव येथून पारोळा येथील जिनिगंमध्ये कापूस घेऊन जाणारा ट्रक मंगळवारी दुपारी साडे तीन वाजता पाळधी गावाजवळ महामार्गावर उलटला. त्यात कापसाच्या ढिगाऱ्याखाली दबून मुकटी, ता.धुळे येथील ९ मजूर जखमी झाले.

पाळधीजवळ कापसाचा ट्रक उलटून मुकटीचे ९ मजूर जखमी
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.२४ : जळगाव येथून पारोळा येथील जिनिगंमध्ये कापूस घेऊन जाणारा ट्रक मंगळवारी दुपारी साडे तीन वाजता पाळधी गावाजवळ महामार्गावर उलटला. त्यात कापसाच्या ढिगाऱ्याखाली दबून मुकटी, ता.धुळे येथील ९ मजूर जखमी झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या अपघातामुळे जळगाव व धुळेकडे जाणारी वाहतूक खोळंबली होती.
जळगाव येथून कापूस भरल्यानंतर ट्रक पारोळा येथील जिनिंगमध्ये जात असताना मंगळवारी दुपारी अचानक खेडी कढोली फाट्याजवळ पलटी झाला. ट्रकमध्ये कापूस असल्याने मजुरांना गंभीर दुखापत झाली नाही.
या अपघातात दिनेश गोकुळ मराठे (वय २२), सोमनाथ चौधरी (वय २४), समाधान अंकुश पाटील (वय ३२), प्रभु हरी भील (वय २८), दिनेश देविदास पाटील (वय २५), सुनील शिवदास सैंदाणे (वय ३५), सुरेश सोमा मोरे (वय ३५), सोमेश नामदेव चौधरी (वय २२) व प्रदीप रणछोड लोहार (वय ३५) असे जखमींची नावे आहेत. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अपघात होताच नागरीकांनी घटनास्थळी धाव घेवून कापसाच्या ढिगाºयाखाली दबलेल्या मजुरांना बाहेर काढले. मदतीला उशिर झाला असता तर कदाचित कापसाच्या ढिगाºयाखाली गुदमरुन मजुराच्या जीवावर बेतले असते.