‘कर्ज मिळवून देतो, विमाही काढा’ म्हणत व्यापाऱ्याला ९ लाखांचा गंडा

By विजय.सैतवाल | Published: September 27, 2023 05:12 PM2023-09-27T17:12:23+5:302023-09-27T17:13:08+5:30

एका नामांकित फायनान्स कंपनीचे नाव सांगून त्या कंपनीकडून तुम्हाला कर्ज मिळवून देतो, असे आमिष दाखवित त्यांचा विश्वास संपादन केला.

9 lakhs to the merchant by saying 'I get loan, get insurance too' | ‘कर्ज मिळवून देतो, विमाही काढा’ म्हणत व्यापाऱ्याला ९ लाखांचा गंडा

‘कर्ज मिळवून देतो, विमाही काढा’ म्हणत व्यापाऱ्याला ९ लाखांचा गंडा

googlenewsNext

जळगाव : नामांकित फायनान्स कंपनीकडून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्यासाठी विमा काढण्याचे सांगून जीवनराम आनंदराम कुमावत (४२, रा. धरणगाव) यांची नऊ लाख १५ हजार ९८ रुपयांमध्ये ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगाव येथील जीवनराम कुमावत हे व्यापारी असून त्यांच्याशी मीनाक्षी अग्रवाल, आलिया, रुही शर्मा, सुधीर सक्सेना असे नाव सांगणाऱ्या चार अनोळखींनी संपर्क साधला. त्यांना एका नामांकित फायनान्स कंपनीचे नाव सांगून त्या कंपनीकडून तुम्हाला कर्ज मिळवून देतो, असे आमिष दाखवित त्यांचा विश्वास संपादन केला. कर्जासाठी त्यांना याच कंपनीसह व अन्य कंपनींचा विमा काढण्यास भाग पाडले. त्यासाठी २७ मार्च २०२३ ते २६ सप्टेंबर २०२३ या दरम्यान कुमावत यांच्याकडून वरील चार जणांनी वेळोवेळी एकूण नऊ लाख १५ हजार ९८ रुपये ऑनलाइन घेतले. मात्र त्यांना त्या बदल्यात कोणतेही कर्ज मंजूर करून दिले नाही.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कुमावत यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून वरील चारही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहेत.

Web Title: 9 lakhs to the merchant by saying 'I get loan, get insurance too'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव