जळगाव पोलीस दलाच्या जनतेशी निगडीत ९ सेवा आॅनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 11:55 AM2018-05-16T11:55:55+5:302018-05-16T11:55:55+5:30

डिजिटल इंडिया या केंद्र सरकारच्या धोरणाच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून जिल्हा पोलीस दलाने जनतेशी निगडित ९ सेवा आॅनलाइन केल्या आहेत. सेवा हमी कायद्यांतर्गत नागरिकांसाठी या सेवा आॅनलाइन करण्यात आल्या आहेत. या सेवांमुळे नागरिकांना पोलीस ठाण्यात जाण्याची आवश्यकता भासत नाही. तंत्रज्ञानात पोलीस दलानेही एक पाऊल पुढे टाकले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. 

9 service online related to the masses of Jalgaon police force | जळगाव पोलीस दलाच्या जनतेशी निगडीत ९ सेवा आॅनलाईन

जळगाव पोलीस दलाच्या जनतेशी निगडीत ९ सेवा आॅनलाईन

Next
ठळक मुद्दे पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांचा पुढाकारघरबसल्या मिळवा परवानग्यासेवा सुरु करणारा जळगाव राज्यातील पहिला जिल्हा 

सुनील पाटील
आॅनलाईन लोकमत
जळगाव : डिजिटल इंडिया या केंद्र सरकारच्या धोरणाच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून जिल्हा पोलीस दलाने जनतेशी निगडित ९ सेवा आॅनलाइन केल्या आहेत. सेवा हमी कायद्यांतर्गत नागरिकांसाठी या सेवा आॅनलाइन करण्यात आल्या आहेत. या सेवांमुळे नागरिकांना पोलीस ठाण्यात जाण्याची आवश्यकता भासत नाही. तंत्रज्ञानात पोलीस दलानेही एक पाऊल पुढे टाकले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. 
या ९ सेवा आॅनलाइन झाल्याने नागरिकांना पोलीस स्टेशनला जाण्याची आता आवश्यकता नाही. वेळेचाही अपव्यय होत नाही. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळू लागला आहे. 
महाआॅनलाइनमध्येही पोलीस दल अग्रेसर 
आपत्कालीन, गुन्ह्यांच्या तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या प्रसंगी पीडित नागरिक व महिलांना तत्काळ पोलिसांची मदत मिळावी यासाठी महाआॅनलाइनमध्ये प्रतिसाद अ‍ॅप सुरू करण्यात आले आहे. 
टोल फ्री क्रमांक, याशिवाय वाहनचोरीची तक्रार करण्यासाठी वाहन चोरी डॉट कॉम हे पोर्टल २७ मे २०१६ पासून सुरू  करण्यात आले आहे.  
लग्नसमारंभ, धार्मिक कार्यक्रम, जयंती, पुण्यतिथी यासाठी आवश्यक असलेली मिरवणूक परवानगी, विविध शस्त्र परवाना, हॉटेल व बियरबार यांचे ना-हरकत प्रमाणपत्र, भारतीय नागरिकांसाठी परदेशी चारित्र्य पडताळणी, वैयक्तिक चारित्र्य पडताळणी, पासपोर्ट, चित्रपट, तमाशा, लोकनाट्य, नाटक व इतर मनोरंजन परवाने, विविध समारंभासाठी लागणारे ध्वनिक्षेपण (लाऊड स्पीकर व अन्य वाजंत्री) व विहीर तसेच तलावात करावयाचे ब्लास्टिंग परवाने आॅनलाइन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या समन्वयातून या सेवा आॅनलाइन करण्यात आल्या आहेत. आपले सरकार पोर्टलवर जाऊन नागरिकांना या सेवांचा फायदा घेता येणार आहे.
प्रत्येक पोलीस ठाण्यात दोन टॅब
तंत्रज्ञानात आणखी पुढचे पाऊल म्हणून पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना दोन स्वतंत्र टॅब देण्याचा निर्णय घेतला.
एक टॅब हा गुन्ह्यांच्या माहितीसाठी असणार आहे, तर दुसरा टॅब हा पासपोर्टसाठी असणार आहे. घटनास्थळावर फोटो काढणे, व्हिडिओ चित्रण करणे, पुरावे घेणे आदी कामे केली जाणार आहेत. या कामासाठी स्वतंत्र टॅब देणारा जळगाव हा महाराष्टÑातील पहिला जिल्हा आहे.

सायबर प्रकल्पाची निर्मिती
नवीन तंत्रज्ञान व उपकरणे वापरून गुन्हे करण्याचे प्रमाण व त्याच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. या साºया घटनांना वेळेत नियंत्रण आणण्यासाठी गृह विभागाने सायबर प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पांतर्गत जिल्हास्तरावर सायबर लॅब, महाराष्टÑ सीईआरटी, सिक्युरिटी आॅपरेशन सेंटर व ट्रेनिंग सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. महाराष्टÑात ४७ ठिकाणी सायबर लॅब होत्या, त्याचे रूपांतर सायबर पोलीस ठाण्यात करण्यात आले आहे. महाराष्टÑात बहुतांश ठिकाणी पोलीस ठाण्यात रूपांतर झालेले नाही, जळगावात मात्र हे पोलीस ठाणे सुरू झाले.

या आहेत आॅनलाइन सेवा
१. मिरवणूक परवानगी
२. शस्त्र परवाना
३. हॉटेल व बियरबार यांचे   ना-हरकत प्रमाणपत्र
४. परदेशी (नोरी) चारित्र्य पडताळणी
५. चारित्र्य पडताळणी
६. पासपोर्ट
७. मनोरंजन परवाने
८. ध्वनिक्षेपण (लाऊड स्पीकर व अन्य वाजंत्री)
९. ब्लास्टिंग परवाना

जनतेला प्रत्येक वेळी पोलीस स्टेशन किंवा पोलीस अधीक्षक कार्यालयात येण्याची गरज भासू नये यासाठी महत्त्वाच्या व वारंवार गरज भासणाºया ९ सेवा आॅनलाइन करण्याचा निर्णय घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित कामेही यात होणार आहे. 
-दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक

Web Title: 9 service online related to the masses of Jalgaon police force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.