जळगाव जिल्ह्यातील 9 क्रीडा संकुले निधीअभावी अपूर्णावस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2017 12:42 PM2017-07-13T12:42:50+5:302017-07-13T12:42:50+5:30
निधी अभावी जळगाव जिल्ह्यात सहा वर्षांपासून 9 तालुका क्रीडा संकुल अपूर्णावस्थेत
ऑ लाईन लोकमत / संजय पाटील अमळनेर, जि. जळगाव, दि. 13 - एकीकडे राज्यात 20 हजार शाळांमध्ये फुटबॉल संघ तयार करण्याचे धोरण शासन राबवत आहे, मात्र निधी अभावी जळगाव जिल्ह्यात सहा वर्षांपासून 9 तालुका क्रीडा संकुल अपूर्णावस्थेत असल्याची विसंगती आहे. ऑक्टोबर मध्ये फिफा फुटबॉल स्पर्धा भारतात होत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार फुटबॉल खेळात आवड निर्माण व्हावी म्हणून राज्यात 20 हजार शाळांमध्ये फूटबॉल संघ निर्माण करण्याचे धोरण राबवले जात आहे. मात्र अनेक शाळांना मैदाने नाहीत, क्रीडा साहित्यासाठी अनुदान नाही. तसेच तालुका पातळीवर क्रीडा संकुल अपूर्णावस्थेत पडले आहेत 2009 मध्ये तत्कालीन राज्यकत्र्यानी प्रत्येक तालुका पातळीवर सरासरी एक कोटींचे क्रीडा संकुल मंजूर केले होते. येणारे अनुदान आणि जागेची उपलब्धता यात दोन वर्षे गेली. मात्र 2011 पासून बांधकामांना सुरुवात झाली. अमळनेर येथील क्रीडा संकुल हॉल.चे बांधकाम, 400 मीटरचा ट्रॅक, संरक्षक भिंत आदी बाबी पूर्ण झाल्या आहेत. परंतु याठिकाणी इनडोअर बॅडमिंटन हॉल, फ्लोअरिंग, पाणी, विद्युत सुविधा, स्वच्छतागृह, आदी बाबी अपूर्ण आहेत. निधी पूर्ण मिळाला नाही म्हणून परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे मैदान खराब होत आहे. दरवर्षी महागाई वाढल्याने बांधकामाचे दर वाढले आहेत. क्रीडा संकुल पूर्ण होण्यासाठी अजून अंदाजे एक कोटींची आवश्यकता आहे. आमदार शिरीष चौधरी पाठपुरावा करीत आहेत. जिल्ह्यात जळगावचे क्रीडा संकुल सोडले तर सर्वत्र तीच परिस्थिती आहेतालुका क्रीडा अधिकारीच नाहीत जिल्ह्यात एकच तालुका क्रीडा अधिकारी मुक्ताईनगर येथे आहे. एरंडोल आणि चाळीसगाव येथे आता तालुका क्रीडा अधिकारी मंजूर झाले आहेत. उर्वरित तालुक्यांना क्रीडा अधिकारीच नाहीतकर्मचा:यांना अत्यल्प मानधनत्याच प्रमाणे प्रत्येक क्रीडा संकुलसाठी दोन कोच, प्रत्येकी 1500 रुपये मानधन होते. आता ते पाच हजार रूपये केले. एक लिपिक 1200 रूपये, एक शिपाई, एक चौकीदार 1000 रूपये महिना मानधनवर मंजूर आहेत. परंतु इतक्या तुटपुंज्या मानधनावर कोणीच काम करायला तयार नाही. त्यामुळे शासनाच्या विसंगत भूमिकेमुळे क्रीडा क्षेत्रात नाराजी व्यक्त होत आहेकेयर टेकर योजना जळगाव जिल्हयात अमळनेर, भुसावळ, भडगाव, चाळीसगाव, रावेर, एरंडोल, मुक्ताईनगर, पारोळा, धरणगाव येथील क्रीडा संकुल निधी अभावी अपूर्ण आहेत. त्यामुळे त्यांचा वापर होत नाही. पाठपुरावा लोकप्रतिनिधींमार्फत होत आहे. शासन केयर टेकर योजना आणत आहे त्यातून देखभाल व वापर सुरू होईल, असे जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी सांगितले.