जिल्ह्यात विद्यार्थी आधार नोंदणीचे काम ९० टक्के पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:29 AM2021-02-18T04:29:13+5:302021-02-18T04:29:13+5:30
जिल्ह्यात पहिली ते बारावीपर्यंतच्या एकूण ३ हजार ३७५ शाळा असून, ८ लाख ७८ हजार ९३४ विद्यार्थी संख्या आहे. ...
जिल्ह्यात पहिली ते बारावीपर्यंतच्या एकूण ३ हजार ३७५ शाळा असून, ८ लाख ७८ हजार ९३४ विद्यार्थी संख्या आहे. यातील ७ लाख ९२ हजार ६५१विद्यार्थ्यांचे विद्यार्थी पोर्टलवर आधार कार्ड नोंदणीचे काम पूर्ण झाले आहे. तर ८६ हजार २८३ विद्यार्थ्यांचे नोंदणीचे काम अपूर्ण आहे. सध्या स्थितीला एकूण ९० टक्के आधार नोंदणीचे काम पूर्ण झाले आहे. या नोंदणी करण्यामध्ये भुसावळ तालुका आघाडीवर असून, ६७ हजार ३३० विद्यार्थ्यांपैकी ६४ हजार ९९८ विद्यार्थ्यांचे काम पूर्ण झाले आहे. त्या खालोखाल एरंडोल तालुक्यात ३२ हजार २३६ पैकी ३० हजार ७०४ विद्यार्थ्यांचे आधार लिकिंग झाले आहे. तर सर्वात कमी जळगाव शहरात १ लाख २ हजार ९६६ विद्यार्थ्यांपैकी ८६ हजार ६७८ विद्यार्थ्यांची आधार नोंदणी झाली आहे. दरम्यान, जळगाव शहरातील शाळांकडून दिलेल्या उद्दिष्टानुसार आधार नोंदणीचे काम सुरू असल्यामुळे, गेल्याच आठवड्यात जि.प. शिक्षण विभागातर्फे शहरातील सर्व प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेऊन तातडीने विद्यार्थांच्या आधार लिकिंगचे काम पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तर पुढील आठवड्यात माध्यामिकच्या मुख्याध्यापकांचीही बैठक घेण्यात येणार आहे.
इन्फो :
जिल्ह्यातील शाळांनी शिक्षक संच मान्यतेसाठी ३१ मार्चपर्यंत विद्यार्थ्यांचे विद्यार्थी पोर्टलवर आधार कार्ड नोंदणी करणे गरजेचे असून, आतापर्यंत जिल्ह्यात ९० टक्के नोंदणीचे काम पूर्ण झाले आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी व माध्यामिक शिक्षणाधिकारी यांच्या सूचनेनुसार या कामाचा केंद्रनिहाय दैनंदिन आढावाही घेण्यात येत असून, लवकरच १०० टक्के नोंदणीचे काम पूर्ण होईल.
विजय पवार, प्रभारी उपशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव