दोन दिवसात लसीचे ९ हजार डोस येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:14 AM2021-04-19T04:14:29+5:302021-04-19T04:14:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या आठवड्यात ४० हजार डोस प्राप्त झाल्यानंतर सर्वच केंद्रांवर लसीकरण सुरू झाले होते. ...

9,000 doses of vaccine will come in two days | दोन दिवसात लसीचे ९ हजार डोस येणार

दोन दिवसात लसीचे ९ हजार डोस येणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या आठवड्यात ४० हजार डोस प्राप्त झाल्यानंतर सर्वच केंद्रांवर लसीकरण सुरू झाले होते. मात्र, काही केंद्रांवरील हे डोस संपल्याने त्या ठिकाणचे लसीकरण बंद असून ज्या केंद्रांवर डोसेस उपलब्ध आहेत त्या केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसात कोविशिल्ड व को-व्हॅक्सिन लसीचे ९ हजार ४२० डोस प्राप्त होणार आहे.

ज्या केंद्रांवर डोस नाहीत त्या केंद्रांवर मागणीनुसार हे डोस दिले जाणार आहे. जिल्ह्यात लसीकरणाने वेग पकडला असून ४५ वर्षावरील नागरिकांचा लसीकरणाला प्रतिसाद मिळत आहे. ही संख्या दीड लाखांच्यावर गेली आहे. शहरातील केंद्रांवरही लसीकरण सुरू असून आरोग्य केंद्रांवरही लस दिली जात आहे. मात्र, शनिवारी ही संख्या कमी झाली होती. आरोग्य केंद्रांमध्ये शनिवारी ४३५ जणांना लस देण्यात आली होती. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या औषध शास्त्र विभागात हे लसीचे डोस आल्यानंतर त्यांचे वाटप होणार आहे. यातील कोविशिल्ड लसीचे डोस हे सेामवारीच सायंकाळपर्यंत येणे अपेक्षित असल्याची माहिती आहे. या ठिकाणी औषध निर्माण अधिकारी रवींद्र पाटील व परिचर सुनील सपकाळ हे लसी उतरून ते वाटप करण्यासाठी कार्यरत आहेत.

असे येणार डोस

५ हजार कोविशिल्ड

४४२० को-व्हॅक्सिन

झालेले लसीकरण

पहिला डोस : २ लाख ५६ हजार ६५१

दुसरा डोस : २९०८०

मोठा साठा आवश्यक

जिल्ह्यातील ४५ वर्षावरील लोकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी लसीचे अद्यापही मोठ्या प्रमाणावर डोस आवश्यक आहेत. गेल्या आठवड्यात ४० हजार डोस प्राप्त झाल्यानंतर दिवसाला सरासरी ८ हजारांपर्यंत लसीकरण होत होते. हे डोस कमी झाल्याने लसीकरणाची आकडेवारीही कमी झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात एकूण १४ लाखांपर्यंत नागरिक ४५ वर्षावरील असल्याने त्या तुलनेत मोठ्या प्रमाणात लसीचे डोस आवश्यक असणार आहे.

या केंद्रांवर बंद

पाराेळा, भुसावळ, अमळनेर, यावल, बोदवड, एरंडोल, पाल, अमळनेर आरोग्य केंद्र, सावदा, मेहूणबारे, अमळगाव या केंद्रावर शनिवारी लसीकरण बंद होते.

Web Title: 9,000 doses of vaccine will come in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.