हॅकथॉन वेबिनारमध्ये ९१५ विद्यार्थी सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:16 AM2021-05-19T04:16:21+5:302021-05-19T04:16:21+5:30

जळगाव : एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकतेच इंटरनल क्वाॅलिटी आसुरन्स आणि संगणक विभाग स्टूडंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने इनसाइट इनटू ...

915 students participated in the hackathon webinar | हॅकथॉन वेबिनारमध्ये ९१५ विद्यार्थी सहभागी

हॅकथॉन वेबिनारमध्ये ९१५ विद्यार्थी सहभागी

Next

जळगाव : एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकतेच इंटरनल क्वाॅलिटी आसुरन्स आणि संगणक विभाग स्टूडंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने इनसाइट इनटू हॅकथॉन या विषयावर तीन दिवसीय वेबिनार घेण्यात आले. यात तब्बल ९१५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.

हॅकथॉन- २०२१ या देश पातळीवरच्या स्पर्धेच्या तयारीसाठी हे वेबिनार महाविद्यालयातील सर्व विभागांतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्‍यात आले होते. प्रत्येक दिवशी दोन तासांचे सत्र घेण्यात आले. यावेळी तेजस पिंगळकर, मोहित चौधरी, सागर पाटील, दीपेश चौधरी, यशश्री महाजन, समक्ष वाणी, गोपाळ अगरवाल, आदित्य नाथानी यांनी आधी स्पर्धेत आलेले अनुभवन विद्यार्थ्यांना सांगून त्यांना मार्गदर्शन केले.

स्पर्धेसाठी कायम तयार रहा..

वेबिनारचे समन्वयक म्हणून संगणक विभागाचे विभागप्रमुख डॉ. जी. के. पटनाईक यांनी काम पाहिले. यशश्री महाजन हिने प्रॉब्लम सिलेक्शन ॲण्ड सोल्युशन या विषयावर सविस्तर, असे मत मांडले. सागर पाटील यांनी इंटरनल हॅकाथॉन याबद्दल माहिती दिली. १३ मे रोजी समक्ष वाणी याने ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी"या विषयावर मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. के. एस. वाणी, उपप्राचार्य डॉ. एस. पी. शेखावत आणि संगणक विभागप्रमुख डॉ. जी. के. पटनाईक यांनी परिश्रम घेतले.

Web Title: 915 students participated in the hackathon webinar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.