जळगावात स्टेट बँकेतून लांबविले 93 हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 11:44 AM2017-07-19T11:44:58+5:302017-07-19T11:44:58+5:30
तिघे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आह़े
Next
ऑ लाईन लोकमतजळगाव, दि. 19 - जिल्हा न्यायालयाच्या कामकाजाची रक्कम बँकेत भरणा करीत असताना बेलीफला तुमचे पैसे खाली पडले आहेत, असे सांगत तीन चोरटय़ांनी 93 हजार 130 रुपयांची रक्कम लांबविल्याची धक्कादायक घटना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलातील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत सकाळी 11 वाजता घडली़ तिघे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आह़े रामचंद्र सीताराम घोडके (वय 56, रा़ भगवान नगर) हे जिल्हा न्यायालयातील दिवाणी न्यायालय वरिष्ठस्तर येथे बेलीफ म्हणून कार्यरत आहेत़ 18 रोजी सकाळी 11़30 घोडके हे सहकारी कर्मचारी शरद सुकदेव पाचपोळ यांच्यासोबत न्यायालयाची 93 हजार 330 एवढय़ा रकमेचा भरणा करण्यासाठी स्टेट बँकेत गेले होत़ेचोरटे परराज्यातील असल्याचा संशयचोरटे हे परराज्यातील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेप्रकरणी रामचंद्र घोडके यांच्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े पोलीस उपनिरीक्षक गजानन राठोड यांनी घोडके व पाचपोळ या दोघा न्यायालयीन कर्मचा:यांचा जबाब नोंदविला आह़े लांबविलेली रक्कम ही न्यायालयाची असल्याने चोरटय़ांच्या शोधार्थ जिल्हापेठ पोलीस कामाला लागले आहेत़ गुन्हे शोध पथकातील कर्मचा:यांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्यान ठिकठिकाणच्या खब:याकडून तसेच पोलीस ठाण्यातील कर्मचा:यामार्फत माहिती काढण्यात येत आह़े दरम्यान 12 वाजून 3 मिनीट ते 12 वाजून 4 मिनीट या एकामिनिटातच चोरटय़ांची बेलीफला चकवा देत डल्ला मारला़