सलग दुसऱ्या दिवशी ९५० पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:28 AM2021-03-13T04:28:12+5:302021-03-13T04:28:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम असून गुरुवारी ९५४ रुग्णसंख्या नोंदविण्यात आली आहे. गंभीर बाब म्हणजे ...

950 for the second day in a row | सलग दुसऱ्या दिवशी ९५० पार

सलग दुसऱ्या दिवशी ९५० पार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम असून गुरुवारी ९५४ रुग्णसंख्या नोंदविण्यात आली आहे. गंभीर बाब म्हणजे प्रलंबित अहवालांमुळे हा आकडा फुगलेला नसून ॲन्टीजन चाचणीत ६८८ बाधित आढळून आले आहे. त्यामुळे संसर्गाचे प्रमाणच मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे यातून समोर येत आहे. शिवाय सलग दुसऱ्या दिवशी सहा बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जिल्ह्यात सोमवारी आरटीपीसीआरचे १६३८ अहवाल समोर आले. यात २६६ बाधित आढळून आले आहेत. प्रलंबित अहवालांची संख्या ४५३ वर आली असून मागील जवळपास सर्व अहवाल स्पष्ट झाले आहे. मागच्या अहवालांमध्ये मोठ्या प्रमाणात बाधित आढळून येतील, अशी शंका व्यक्त करण्यात येत होती. मात्र, तसे न होता, नियमीत होणाऱ्या ॲन्टीजन चाचण्यांमध्येच बाधित आढळून येत असल्याने चोवीस तासातच मोठ्या प्रमाणात रुग्ण समोर येत असल्याचे चित्र आहे.

मृत्यू थांबेना

कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे रोज होणाऱ्या मृत्यूची संख्याही गेल्या चार दिवसांपासून अचानक वाढली आहे. यात गुरूवारी सहा मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यात जळगाव शहरातील ४६ व ७० वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. यासह भुसावळ तालुक्यातील ७४ वर्षीय वृद्ध व ८४ वर्षीय महिला, चोपडा तालुक्यातील एक ७० वर्षीय महिला, बोदवड तालुक्यातील ७१ वर्षीय पुरूषांचा मृतांमध्ये समावेश आहे.

पॉझिटिव्हिटी

आरटीपीसीआर : १६.२३ टक्के

ॲन्टीजन : २५.८५ टक्के

शहरात ३१० रुग्ण

जळगाव शहर हे जिल्ह्यात मोठे हॉटस्पॉट म्हणून समोर आले आहे. गुरूवारी शहरात ३१० नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत. शहराच्या सक्रिय रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असून ही संख्या २४९६ वर पोहोचली आहे. मृतांची संख्या ३२२ वर पोहोचली आहे. दरम्यान, गुरूवारी १६० रुग्ण कोरोनामुक्त झाले.

चाळीसगाव, चोपड्यात संसर्ग वाढताच

चाळीसगावात व चोपड्यात पुन्हा रुग्णवाढ समोर आली आहे. चोपड्यात १२१ तर चाळीसगावात ७२ रुग्ण आढळून आले आहेत. यासह एरंडोलमध्ये ९८ तर भुसावळमध्ये ७० नवे बाधित आढळून आले आहेत.

जीएमसी फुल्लच

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सर्व बेड फुल्ल असून या ठिकाणी एकही जागा उपलब्ध नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या ठिकाणी गंभीर रुग्णांना जागा मिळावी म्हणून कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना अन्यत्र हलविले जात आहे. दरम्यान, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद हे कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यांची प्रकृती ठिक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. प्रभारीपदभार अद्याप कोणोकडे सोपविण्यात आलेला नसल्याची माहिती आहे.

ऑक्सिजन टँक लवकरच सेवेत

ऑक्सिजन टँकला पेसोची मान्यता मिळाल्यानंतर यासाठी लागणाऱ्या लिक्विडची ऑर्डर जीएमसीकडून देण्यात आली असून येत्या दोन ते तीन दिवसात या टँकमध्ये लिक्विड भरून या टँकद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार असल्याची माहिती आहे. मुंबईला मान्यतेची कागदपत्रे सादर केल्यानंतर त्या ठिकाणाहून लिक्विड मिळणार आहे.

Web Title: 950 for the second day in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.