जिल्ह्यातून ९६६० ईव्हीएम जाणार तामिळनाडूमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:17 AM2020-12-06T04:17:18+5:302020-12-06T04:17:18+5:30
जळगाव : विविध निवडणुकांसाठी जिल्ह्यात असलेले मतदान यंत्र आता तामिळनाडू येथे पाठविण्यात येणार असून त्यासाठी त्यांची भुसावळ येथील गोदामात ...
जळगाव : विविध निवडणुकांसाठी जिल्ह्यात असलेले मतदान यंत्र आता तामिळनाडू येथे पाठविण्यात येणार असून त्यासाठी त्यांची भुसावळ येथील गोदामात तपासणी सुरू केली आहे. शनिवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत निवडणूक शाखेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तपासणी करण्यास सुरुवात केली असून ती पूर्ण झाल्यानंतर व नोंद झाल्यानंतर (डाटा इंट्री) एकूण नऊ हजार ६६० यंत्र रवाना करण्यात येणार आहे.
यामध्ये बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्ही पॅट असे एकूण नऊ हजार ६६० युनिट असून ते तिरुपती येथे पाठविण्यात येणार आहे. या यंत्रांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांची डाटा एंट्री करण्यात येऊन एक तर परिवहन महामंडळाच्या बसने अथवा खाजगी वाहनाने हे यंत्र पाठविण्यात येणार आहे.
शनिवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्यासह निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार सुनील समदाणे, अनंत कळसकर यांच्यासह निवडणूक शाखेच्या आठ ते नऊ जणांनी ही तपासणी केली.