सफाईबाबत 10 दिवसात 97 तक्रारी
By admin | Published: January 10, 2017 12:30 AM2017-01-10T00:30:22+5:302017-01-10T00:30:22+5:30
सुविधा : 65 तक्रारी निकाली; 325 नागरिकांनी डाऊनलोड केले इएसबीएम अॅप
जळगाव : सफाईसंदर्भातील तक्रारी घरबसल्या करता याव्यात यासाठी महानगरपालिकेने ‘बीएसएनएल’च्या मदतीने इएसबीएम अॅप तयार केले असून आतार्पयत 325 नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये हे अॅप डाऊनलोड करून घेतले आहे. तसेच गेल्या 10 दिवसात या अॅपच्या माध्यमातून 97 तक्रारी मनपाला प्राप्त झाल्या असून 65 तक्रारी निकाली निघाल्या आहेत.
मनपाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत सफाईच्या स्पर्धेसाठी पूर्ण तयारी केली असून या 2000 गुणांच्या स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पूर्तता मनपाकडून करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मनपाने नागरिकांना घरबसल्या सफाईबाबत तक्रारी करता येऊ शकतील.
तसेच मनपाकडूनही त्याची तातडीने दखल घेऊन निकाली काढण्यात येतील, यादृष्टीने इएसबीएम अॅप (सॉफ्टवेअर) बीएसएनएलच्या मदतीने विकसीत करून घेण्यात आले असून प्ले-स्टोअरवरून नागरिकांना ते मोफत डाऊनलोड करून घेता येऊ शकते. डिसेंबर 2016 अखेरीस हे अॅप नागरिकांसाठी खुले झाले असून आतार्पयत 325 नागरिकांनी ते त्यांच्या मोबाईलमध्ये डाऊनलोडही करून घेतले आहे.