जळगाव जिल्ह्यात रोहयोची 97 लाखांची मजुरी थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 07:00 PM2017-09-19T19:00:18+5:302017-09-19T19:06:41+5:30
जामनेर, चोपडा व चाळीसगाव तालुक्यातील सर्वाधिक मजुरी थकीत
विलास बारी / ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि 20 : दुष्काळीस्थिती प्रत्येक मजुराच्या हाताला काम मिळावे यासाठी सुरु केलेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हाभरात अनेक ठिकाणी कामे सुरू केली आहेत. मात्र या ठिकाण्ी रोजंदारीने काम करणरृया कुटुंबातील सदस्यांची तब्बल 97 लाख 59 हजार रुपयांची मजुरी थकीत आहे.
जिल्ह्यात 3 लाख 34 हजार कुटुंबांची नोंदणी
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील तीन लाख 34 हजार 984 कुटुंबांनी शासनाकडे नोंदणी केली आहे. या कुटुंबातील 7 लाख 69 हजार 639 सदस्यांची नोंदणी आहे. सर्वाधिक 3 लाख 51 हजार 04 कुटुंबाची नोंदणी ही चाळीसगाव तालुक्यातील आहे. त्यापाठोपाठ 3 लाख 50 हजार 68 कुटुंबांची नोंदणी ही जामनेर तालुक्यातील आहे
जिल्ह्यातील 92 हजार मजुरांकडून कामाची मागणी
या आर्थिक वर्षात जिल्हाभरातील 92 हजार 153 मजुरांनी शासनाकडे रोजगाराची मागणी केली होती. त्यातील 92 हजार 06 मजुरांना शासनातर्फे रोजगार हमी योजनेंतर्गत कामे देण्यात आली आहे. त्यानुसार 11 लाख 69 हजार 932 दिवसांचे काम या मजुरांना शासनाकडून देण्यात आले आहे
97 लाख 59 हजारांची मजुरी थकीत
या योजनेंतर्गत मजुरांकडून जवाहर विहिरी, शासकीय नालाबांध, जलयुक्त शिवार योजना, जलपुर्नभरण यासह विविध शासकीय कामे करून घेण्यात आली. मात्र शासनाकडून अजूनही 97 लाख 59 हजार रूपयांची मजुरी कामगारांना अदा करण्यात आलेली नाही. पावसाने ओढ दिल्याने हंगाम धोक्यात आहे. त्यातच रोजगार हमी योजनेंतर्गत केलेल्या कामाचा मोबदला शासनाकडून मिळत नसल्याने गोरगरीब कुटुंबाची स्थिती दयनीय आहे.
शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर तत्काळ रक्कम अदा करण्याचे आदेश आहे. पूर्वी 15 दिवसांर्पयत ही रक्कम जमा होत नव्हती. या आठवडाभरात थकीत रकमेतील निम्मेपेक्षा जास्त रक्कम मजुरांच्या खात्यावर जमा केली आहे. त्याबाबतचा अहवाल संबधित गटविकास अधिका:यांकडून मागविण्यात आला आहे.
जितेंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी योजना, जळगाव.