जळगाव शहरातील ९७ टक्के रुग्ण झालेत बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:12 AM2021-06-05T04:12:16+5:302021-06-05T04:12:16+5:30

जळगाव : दुसऱ्या लाटेत जळगाव शहरापाठोपाठ कोरोनाने सर्वाधिक भयावह रूप दाखविले ते चोपडा तालुक्यात. नियमित सरासरी ३०० बाधित रुग्ण ...

97% of patients in Jalgaon city are cured | जळगाव शहरातील ९७ टक्के रुग्ण झालेत बरे

जळगाव शहरातील ९७ टक्के रुग्ण झालेत बरे

Next

जळगाव : दुसऱ्या लाटेत जळगाव शहरापाठोपाठ कोरोनाने सर्वाधिक भयावह रूप दाखविले ते चोपडा तालुक्यात. नियमित सरासरी ३०० बाधित रुग्ण आणि मोठ्या प्रमाणात होणारे मृत्यू यामुळे तालुका हादरला होता. मात्र, कोरानातून जिल्हा सावरत असताना याच चोपडा तालुक्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही सर्वाधिक असल्याची दिलासादायक आकडेवारीही समोर येत आहे. चोपडा तालुक्यातील ९७.१५ टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली असून हे प्रमाण जिल्ह्यात सर्वाधिक आहे.

चोपड्याच्या खालोखाल जळगाव शहराची उत्तम कामगिरी असून या ठिकाणी ९७.०७ टक्के रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. जिल्ह्यात १५ फेब्रुवारीपासून दुसरी लाट सुरू झाली. तेव्हापासून रुग्णसंख्या वाढायला सुरूवात झाली हाेती. अगदी सुरुवातीच्या काळापासून जळगाव शहर व चोपडा तालुका ही दोन ठिकाणे मोठे हॉट स्पॉट म्हणून समोर आली होती. चोपडा व जळगावात परिस्थिती अत्यंत भीषण होत असताना, प्रशासनाने या दोन ठिकाणांवर लक्ष केंद्रित केल्यानंतर चाचण्यांचे प्रमाण वाढले व हळू हळू कोरोना आटोक्यात आला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत १४०४४६ बाधित रुग्णांची संख्या असून १३३५९८ रुग्ण बरे झाले आहेत, तर ४३०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्याचा रिकव्हरी रेट वाढला

३१ मार्च : ८४.९२ टक्के

३० एप्रिल : ८९.४७ टक्के

३१ मे : ९४.२१ टक्के

३ जून : ९५.१२ टक्के

असा आहे तालुकानिहाय रिकव्हरी रेट...

जळगाव शहर : ९७.०७ टक्के

भुसावळ : ९३.७१ टक्के

अमळनेर : ९६.७१ टक्के

चोपडा : ९७.१५ टक्के

पाचोरा : ९३.४२ टक्के

भडगाव : ९६.५९ टक्के

धरणगाव : ९५.८० टक्के

यावल : ९२.१७ टक्के

एरंडोल : ९५.४७ टक्के

जामनेर : ९३.८३ टक्के

रावेर : ९२.४० टक्के

पारोळा : ९६.५२ टक्के

चाळीसगाव : ९१.९३ टक्के

मुक्ताईनगर : ९२.८२ टक्के

बोदवड : ९२.२३ टक्के

Web Title: 97% of patients in Jalgaon city are cured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.