९८ टक्के विद्यार्थी म्हणतात, शाळा सुरू व्हावी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:17 AM2021-05-21T04:17:53+5:302021-05-21T04:17:53+5:30

शाळास्तर सर्वेक्षण : ५८.१ टक्के पालकांचा ऑनलाइन शिक्षणाला नकार लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना व्हायरसच्या संकटामुळे शालेय मुलांपासून ...

98% students say school should start ... | ९८ टक्के विद्यार्थी म्हणतात, शाळा सुरू व्हावी...

९८ टक्के विद्यार्थी म्हणतात, शाळा सुरू व्हावी...

Next

शाळास्तर सर्वेक्षण : ५८.१ टक्के पालकांचा ऑनलाइन शिक्षणाला नकार

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना व्हायरसच्या संकटामुळे शालेय मुलांपासून ते नोकरी करणाऱ्या लोकांपर्यंत कोरोनाचे प्रत्येकाच्या आयुष्यावर परिणाम केला. वर्षभरापासून शाळासुद्धा बंद आहेत. ऑनलाइन शिक्षण मिळते; पण बहुतांश विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन सुविधाचे नाही. परिणामी, त्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहावे लागते. आता विद्यार्थीदेखील घरांमध्ये राहून कंटाळली आहेत. त्यामुळे शाळा सुरू व्हावी, असे मत ९८ टक्के विद्यार्थ्यांचे असल्याचे ‘मानव सेवा विद्यालया’च्या वतीने घेण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

कोरोनाचा शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक अशा गोष्टींवर तसेच विद्यार्थी, पालकांवर देखील परिणाम झालेला आहे. यावर मानव सेवा विद्यालयाच्या वतीने शाळास्तरावर सर्वेक्षण करण्‍यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पंधरा प्रश्नांची तर पालकांसाठी वीस प्रश्नांची प्रश्नावली तयार करण्‍यात आली होती. नंतर प्रश्नावली व्हॉटस्ॲपला पाठविण्यात आली. आठ दिवस हे सर्वेक्षण करण्‍यात आले. त्यात एकूण ३५ प्रश्नांवर विद्यार्थी व पालकांची मते जाणून घेण्‍यात आली.

अभ्यासाची सवय होतेय कमी...

सर्वेक्षणात इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची मते जाणून घेण्यात आली. पंधरा प्रश्नांची प्रश्नावली त्यांना पाठविण्यात आली. यात ६३.१ टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण पद्धत आवडत नसल्याचे समोर आले. तर ९६.९ टक्के विद्यार्थ्यांना शाळेत यावेसे वाटते. तसेच ऑनलाइन शिक्षणापेक्षा शाळेतील प्रत्यक्ष शिक्षण आवडत असल्याचे ९७.७ टक्के विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर शाळा बंद असल्यामुळे अभ्यासाची सवय कमी होत असल्याचे ७८.५ टक्के विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. ३९.२ टक्के विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षणासाठीचे साहित्य नसल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले.

पाल्यांची चिडचिड वाढली...

विद्यार्थ्यांप्रमाणे पालकांची मतेसुद्धा सर्वेक्षणाच्या माध्यमातून मानव सेवा विद्यालयाने जाणून घेतली. पालकांना वीस प्रश्नांची प्रश्नावली पाठविण्यात आली होती. कोरोनामुळे वर्षभरापासून शाळा बंद आहे. परिणामी, पाल्यांची चिडचिड वाढली असल्याचे ६५.५ पालकांनी सर्वेक्षणातून सांगितले. तर ५८.१ टक्के पालकांनी ऑनलाइन शिक्षणाला नकार दिला तर ४१.९ पालकांनी होकार दिला. त्याचबरोबर ऑनलाइन शिक्षणापासून पाल्य समाधानी नसल्याचे ६७.५ टक्के विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचे ८०.३ टक्के पालकांना वाटते. ऑनलाइन शिक्षणामुळे पाल्याची शिक्षणाची आवड कमी होत असल्याचे ७२.९ टक्के पालकांना वाटत असून कोरोनाची स्थिती विद्यार्थ्यांसाठी चिंताजनक असल्याचे ९५.८ टक्के असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

काय वाटते विद्यार्थ्यांना... (टक्केवारीनुसार उत्तर)

१) कोरोना संसर्गाची भीती वाटते का?

- होय (८५.४ टक्के)

- नाही (१४.६ टक्के)

--------------------------

२) कोरोना काळात शाळा बंद आहे हे तुम्हाला आवडते का?

- होय (१३.८ टक्के)

- नाही (८६.२ टक्के)

--------------------------

३) ऑनलाइन शिक्षण पद्धत आवडते का?

- होय (३६.९ टक्के)

- नाही (६३.१ टक्के)

-------------------------

४) ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याचा आनंद वाटतो?

- होय (४८.५ टक्के)

- नाही (५१.५ टक्के)

--------------------

५) शाळेत यावेसे वाटते का?

- होय (९६.९ टक्के)

- नाही (३.९ टक्के)

---------------------------

६) ऑनलाइन तासिकेने मनावर ताण येतो?

- होय (५२.३ टक्के)

- नाही (४७.७ टक्के)

--------------------------

७) परीक्षा रद्द करण्याचा निर्णय योग्य आहे का?

- होय (३०.८ टक्के)

- नाही (६९.२ टक्के)

---------------------

८) ऑनलाइन शिक्षणापेक्षा शाळेतील प्रत्यक्ष शिक्षण आवडते का?

- होय (९७.७ टक्के)

- नाही (२.३ टक्के)

------------------

९) कोरोनामुळे स्वच्छतेचे महत्त्व समजते का?

- होय (९९.२ टक्के)

- नाही (०.८ टक्के)

------------------

१०) ऑनलाइन शिक्षणासाठीचे साहित्य उपलब्ध आहे का?

- होय (३९.२ टक्के)

- नाही (६०.८ टक्के)

------------------

११) कोरोना काळात एकमेकांच्या वस्तू हाताळणे योग्य आहे का?

- होय (३.१ टक्के)

- नाही (९६.९ टक्के)

--------------------

१२) अभ्यासाची सवय कमी झाली का?

- होय (७८.५ टक्के)

- नाही (२१.५ टक्के)

----------------------

१३) कोरोना संसर्गजन्य आजार आहे का?

- होय (९२.३ टक्के)

- नाही (७.७ टक्के)

---------------------

१४) शासनाचे निर्बंध पाळावेत का?

- होय (१०० टक्के)

- नाही (०० टक्के)

-------------------

१५) शाळा सुरू व्हावी असे वाटते का?

- होय (९८.५ टक्के)

- नाही (१.५ टक्के)

Web Title: 98% students say school should start ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.