९८९ अहवाल प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:17 AM2021-04-27T04:17:23+5:302021-04-27T04:17:23+5:30

१०३ रुग्ण कोरेानामुक्त जळगाव : मध्यंतरी हॉटस्पॉट ठरलेल्या चोपडा तालुक्यातही रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून, सोमवारी तालुक्यातील ...

989 reports pending | ९८९ अहवाल प्रलंबित

९८९ अहवाल प्रलंबित

Next

१०३ रुग्ण कोरेानामुक्त

जळगाव : मध्यंतरी हॉटस्पॉट ठरलेल्या चोपडा तालुक्यातही रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून, सोमवारी तालुक्यातील १०३ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर त्यापेक्षा कमी ७२ रुग्ण आढळून आले आहेत. चोपड्यात मध्यंतरी रोज तीनशे किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण समोर येत होते.

जीएमसीत बैठक

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सोमवारी बैठक घेऊन सर्व डॉक्टरांना आपला कक्ष सोडू नये, अशा सूचना दिल्या आहेत. या बैठकीला सर्व विभागप्रमुख व प्रमुख डॉक्टर उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी सर्व आढावा घेतला.

राजकीय हालचाली थंड

जळगाव : जिल्हा परिषदेत राजकीय हालचाली पुन्हा एकदा थंड झाल्या आहेत. मध्यंतरी विरोधकांनी माजी मंत्री एकनाथ खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली होती. शिवाय सभात्याग केल्याने राजकीय वातावरण तापले होते. मात्र, त्यानंतर ठोस हालचाली झालेल्या नाहीत.

Web Title: 989 reports pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.