जळगाव जिल्ह्याचा दहावीचा ९९.९४ टक्के निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:14 AM2021-07-17T04:14:12+5:302021-07-17T04:14:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा होऊ शकल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा होऊ शकल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. यात जळगाव जिल्ह्याचा निकाल ९९.९४ टक्के लागला आहे. यंदा दहावीच्या निकालात मुलांनी बाजी मारली आहे.
शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर झाला. त्यामुळे दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांनी मंडळाचे अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन केले खरे पण मंडळाची अधिकृत संकेतस्थळच हँग झाल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. एकाचवेळी अनेक विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर लॉगिन केल्याने मंडळाची साईट क्रॅश झाली होती.
श्रेणीसुधार योजनेतंर्गत नोंदणी केल्या विद्यार्थ्यांचा निकाल राखीव
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस श्रेणीसुधार योजनेतंर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. सदर विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधीमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुढील एक किंवा दोन संधी उपलब्ध राहील.
विभागाचा ९९.९६ टक्के निकाल
नाशिक विभागाचा ९९.९६ टक्के निकाल लागला आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्याचा ९९.९७, धुळे जिल्ह्याचा ९९.९८ तसेच जळगाव जिल्ह्याचा ९९.९४ व नंदुरबार जिल्ह्याचा ९९.९९ टक्के निकाल लागला आहे. यात विभागात सर्वाधिक निकाल हा नंदुरबार जिल्ह्याचा आहे.
५८२७९ पैकी ५८२४९ विद्यार्थी उत्तीर्ण
दहावीच्या परीक्षेसाठी ५८ हजार २७९ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५८ हजार २४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९९.९४ आहे. विभागात केवळ हिंदी (प्रथम भाषा) विषयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तसेच हिंदी (द्वितीय, तृतीय भाषा) ९९.९२, मराठी (प्रथम भाषा) विषयाचा निकाल ९९.९२, मराठी (द्वितीय, तृतीय भाषा) विषयाचा ९९.९७, उर्दू विषयाचा ९९.९५, इंग्रजी (प्रथम भाषा) विषयाचा ९९.९९ तसेच इंग्रजी (द्वितीय, तृतीय भाषा) विषयाचा ९९.९२, गणित विषयाचा ९९.९३, विज्ञान विषयाचा ९९.९६ व सामाजिक शास्त्र विषयाचा ९९.९७ टक्के निकाल लागला आहे.
यंदा निकालात मुलांची बाजी...
दहावीच्या निकालात यंदा जळगाव जिल्ह्यातील मुलांनी बाजी मारली आहे. ३३ हजार ४९३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ३३ हजार ४७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. मुलांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ही ९९.९५ टक्के आहे. तसेच परीक्षेसाठी २४ हजार ७८६ विद्यार्थिनींनी नोंदणी केली होती. त्यापैकी २४ हजार ७७१ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९९.९३ टक्के अशी आहे.
००००००००००००
- श्रेणीनिहाय उत्तीर्णतेची विद्यार्थी संख्या (जळगाव जिल्हा)
विशेष प्राविण्य - २४,४२२
प्रथम श्रेणी - २९,२४५
द्वितीय श्रेणी - ४,४७७
पास श्रेणी - १०५
००००००००००००००
पाच वर्षातील जळगाव जिल्ह्याचा निकाल
मार्च २०१७ : ८७.७८
मार्च २०१८ : ८८.०८
मार्च २०१९ : ७६.९२
मार्च २०२० : ९३.५१
जुलै २०२१ : ९९.९४
०००००००००००००
- दृष्टिक्षेपात निकाल
परीक्षेला नोंदणी केलेले एकूण विद्यार्थी - ५८ हजार २७९
एकूण उत्तीर्ण विद्यार्थी - ५८ हजार २४९
एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी - ९९.९४ टक्के
०००००००००००
निकालाची वैशिष्ट्ये
- निकालात मागील वर्षीच्या तुलनेत ६ टक्के वाढ
- नाशिक विभागात नंदुरबार जिल्ह्याचा ९९.९९ टक्के निकाल
- विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता, पण साईट क्रॅश झाल्याने हिरमोड
- नागपूरचा निकाल सर्वात कमी
- यंदा मुलांची बाजी
- ३० विद्यार्थ्यांचा निकाल राखीव
००००००००००००००
विभागातील टक्केवारी
जळगाव - ९९.९४
नाशिक - ९९.९७
धुळे - ९९.९८
नंदुरबार - ९९.९९