थकीत पगारासाठी 9 ग्रा.पं. मधील कर्मचा:यांचे चोपडा येथे उपोषण

By admin | Published: May 22, 2017 04:46 PM2017-05-22T16:46:36+5:302017-05-22T16:46:36+5:30

थकीत पगार मिळावा या मागणीसाठी तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीमधील कर्मचा:यांनी आज पंचायत समिती कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.

9gp for tired salary Employee: Fasting at Chopda | थकीत पगारासाठी 9 ग्रा.पं. मधील कर्मचा:यांचे चोपडा येथे उपोषण

थकीत पगारासाठी 9 ग्रा.पं. मधील कर्मचा:यांचे चोपडा येथे उपोषण

Next

 चोपडा,दि.22- थकीत पगार मिळावा या मागणीसाठी तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीमधील कर्मचा:यांनी आज पंचायत समिती कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.

तालुक्यातील मोहरद,पारगाव, देवगाव, मितावली, वरगव्हाण येथील प्रत्येकी 2-2 तर चांदण्यातलाव, पुनगाव, विष्णापूर, अकुलखेडे येथील एक-एक अशा  9 गावांमधील 14 कर्मचा:यांना  गेल्या एक ते दीड वर्षापासून पगार मिळालेले नाहीत.
थकीत पगार मिळावेत या मागणीसाठी ईश्वर रमेश पाटील, सिकंदर रूबाब तडवी, सत्तार तडवी, वाल्मीक अभिमन इंगळे, गोपाल आत्माराम पाटील, राजेंद्र धनसिंग पाटील, प्रकाश सीताराम पाटील, सुनील रघुनाथ बाविस्कर, प्रकाश तोताराम रल, सुमनबाई प्रकाश रल, भाऊसाहेब आधार पाटील, जगदीश बारेला, रतन सखाराम आधारके, प्रमोद सूर्यवंशी हे कर्मचारी सोमवारी पंचायत समितीसमोर लाक्षणिक उपोषणास बसले. उपोषणकत्र्याचे नेतृत्व अमृत महाजन यांनी केले. 

Web Title: 9gp for tired salary Employee: Fasting at Chopda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.