धार्मिक भावना दुखावल्या, सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल
By सुनील पाटील | Published: October 4, 2022 04:45 PM2022-10-04T16:45:22+5:302022-10-04T16:47:06+5:30
मोहाडी रस्त्यावरील नेहरु नगरात आयोजित दुर्गोत्सव मंडळात सोमवारी रात्री दोन पुरुषांची दुसऱ्या धर्मातील महिलांचे वस्त्र परिधान करुन नृत्य केले. तर दोघांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला होता.
जळगाव : शहरात एका दुर्गोत्सव मंडळात आयोजित गरबा कार्यक्रमात फॅन्सी ड्रेस स्पर्धेत सर्वधर्म समभाव संदेश दर्शविण्यासाठी तरुणांनी परिधान केलेल्या वस्त्रांचा व्हिडीओ व्हायरल झाला असून याप्रकरणी वस्त्र परिधान करणाऱ्या चौघांसह अध्यक्ष, उपाध्यक्ष अशा सहा जणांविरुध्द धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहाडी रस्त्यावरील नेहरु नगरात आयोजित दुर्गोत्सव मंडळात सोमवारी रात्री दोन पुरुषांची दुसऱ्या धर्मातील महिलांचे वस्त्र परिधान करुन नृत्य केले. तर दोघांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला होता. या प्रकारामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याची तक्रार एका तरुणाने एमआयडीसी पोलिसात केली. त्यानुसार मंगळवारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
या व्हिडीओच्या माध्यमातून समाजात चुकीचा संदेश पसरवला जात आहे. व्हिडीओचे स्क्रीन शॉट घेऊन काही समाजकंटक तेढ निर्माण करु पाहत आहेत. समाजात शांतता टिकवून ठेवणे आपल्या सर्वांचे कर्तव्य असून प्रत्येकाने आपल्या जबाबदारीचे भान ठेवावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी केले आहे.