जळगाव : कर्जाच्या जाचाला कंटाळून वडली येथील शेतकऱ्याने कुटुंबासह केले विषप्राशन
By विलास.बारी | Published: April 6, 2023 04:44 PM2023-04-06T16:44:20+5:302023-04-06T16:47:02+5:30
पत्नी व मुलाची प्रकृती गंभीर आहे.
जळगाव : जेमतेम शिल्लक असलेली जमीन, त्यात अतिवृष्टीमुळे कमी आलेले उत्पन्न, घरात बेरोजगारीने त्रस्त झालेला मुलगा, त्यातच घेतलेल्या कर्जाची परतफेड होऊ न शकल्याने गुरुवारी सकाळी ७:३० वाजता जळगाव तालुक्यातील वडली येथील एका शेतकऱ्याने आपल्या कुटुंबीयांसोबत विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर पत्नी व मुलाची प्रकृती गंभीर आहे.
तालुक्यातील वडली येथील शेतकरी नारायण दंगल पाटील (वय ६६) हे पत्नी भारती नारायण पाटील (वय ६०) व मुलगा गणेश नारायण पाटील (वय २४) यांच्या समवेत वास्तव्याला आहेत. गुरुवारी सकाळी ७:३० वाजता हा प्रकार उघडकीस आला.
नारायण पाटील यांचा पुतण्या श्यामकांत पाटील यांनी तत्काळ तिघांना खासगी वाहनाने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यात उपचारादरम्यान नारायण पाटील यांचा मृत्यू झाला. तर मुलगा गणेश व पत्नी भारती यांची प्रकृती गंभीर आहे.