हिंस्र प्राण्याने पाडला पाच जनावरांचा फडशा, गावात उडाली खळबळ
By चुडामण.बोरसे | Published: September 27, 2022 12:25 PM2022-09-27T12:25:52+5:302022-09-27T12:26:58+5:30
पाटील यांची गावालगत शेती आहे. शेतात बैल जोडी, गायी , वासरे यांच्यासह १० ते १२ पाळीव जनावरे आहेत
निपाणे जि. जळगाव : हिंस्त्र प्राण्याने केलेल्या हल्ल्यात पाच जनावरे ठार झाली. ही घटना जवखेडेसीम ता. एरंडोल येथे सोमवारी रात्री घडली. जवखेडेसिम येथील शेतकरी संजय कैलास पाटील यांच्या मालकीची ही जनावरे होती.
पाटील यांची गावालगत शेती आहे. शेतात बैल जोडी, गायी , वासरे यांच्यासह १० ते १२ पाळीव जनावरे आहेत. पाटील हे मंगळवारी सकाळी गायीचे दूध काढण्यासाठी गेले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी लागलीच शिवसेना तालुकाप्रमुख वासुदेव पाटील यांना हकिकत कळवली. वासुदेव पाटील यांनी वनविभागाला कळवले. वनरक्षक विजय माळी, वनमजूर रविंद्र पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत नागने ( आडगाव ) यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. शेतकरी पाटील यांचे लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.