जळगाव : चाळीसगावला आढळला बिबट्याचा बछडा, ऊसतोड सुरु असतांना झाले दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 10:21 PM2022-11-30T22:21:39+5:302022-11-30T22:22:37+5:30

वनविभागाने लावले ट्रॅप कॕमेरे

A leopard calf was found in Chalisgaon jalgaon forest department on spot |  जळगाव : चाळीसगावला आढळला बिबट्याचा बछडा, ऊसतोड सुरु असतांना झाले दर्शन

 जळगाव : चाळीसगावला आढळला बिबट्याचा बछडा, ऊसतोड सुरु असतांना झाले दर्शन

googlenewsNext

जिजाबराव वाघ 
मेहुणबारे लगत असणाऱ्या शिदवाडी शिवारात बुधवारी ऊसतोड सुरु असतांना सकाळी ९ वाजता बिबट्याचे बछडे आढळून आले. हे बछडे नुकतेच जन्मले असण्याची शक्यता वनविभागाने व्यक्त केली आहे. बछड्याचे डोळेही अजून उघडले नसल्याने त्याच्या शोधात मादी बिबट पुन्हा शेतात येऊ शकते. यामुळे आजुबाजूचा परिसर रिकामा करुन दोन ट्रॅप कॕमेरे लावण्यात आले आहेत. 

भऊर - जामदा रस्त्यालगत दयानंद निवृत्ती सोनवणे यांच्या शेतात ऊसतोड सुरु आहे. बुधवारी ऊसाची तोड करीत असतांना नुकतेच जन्मलेले बछडे मजुरांच्या नजरेस पडले. यामुळे ऊसतोड मजुरांमध्ये घाबरले. याबाबत वनविभागाला कळविण्यात आले.

चाळीसगाव वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शितल नगराळे, वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, अमित पाटील, अश्विनी ठाकरे, संजय चव्हाण, श्रीराम राजपूत, बाळू शितोळे, राहुल मांडोळे यांनी तातडीने घटनास्थळ गाठले आणि  परिसर रिकामा केला. बछड्याच्या शोधात मादी बिबट पुन्हा शेतात येण्याची शक्यता असल्याने ट्रॅप कॕमेरे लावण्यात आले. दोन कर्मचारी देखील गस्तीसाठी नियुक्त करण्यात आले आहेत.

Web Title: A leopard calf was found in Chalisgaon jalgaon forest department on spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.