धक्कादायक! आरोपीला ताब्यात देण्याच्या मागणीसाठी जमावाचा पोलिस ठाण्यावर हल्ला, दोन पोलिस गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 11:09 PM2024-06-20T23:09:42+5:302024-06-20T23:10:52+5:30

जामनेर : दगडफेकीत निरीक्षकासह १० कर्मचारी जखमी, पोलिसांचा हवेत गोळीबार

A mob attacked the police station demanding the custody of the accused  | धक्कादायक! आरोपीला ताब्यात देण्याच्या मागणीसाठी जमावाचा पोलिस ठाण्यावर हल्ला, दोन पोलिस गंभीर

धक्कादायक! आरोपीला ताब्यात देण्याच्या मागणीसाठी जमावाचा पोलिस ठाण्यावर हल्ला, दोन पोलिस गंभीर

मोहन सारस्वत, लियाकत सय्यद

जामनेर  (जि. जळगाव)  : एका गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून करुन पसार झालेल्या सुभाष उमाजी भील (३५) या आरोपीला पकडण्यात आले. त्याला आमच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी जमलेल्या जमावाने जामनेर पोलिस ठाण्यावर हल्ला केला.  जमावाने केलेल्या दगडफेकीत पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह १० पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. ही घटना गुरुवारी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास घडली. 

पोलिसांनी अश्रुधाराच्या नळकांड्या फोडल्या. तरीही जमाव शांत होत नव्हता. जमावाच्या दगडफेकीत पोलिस ठाण्याच्या काचा फुटल्या.  तसेच संतप्त जमावाने एक दुचाकी जाळली तसेच अनेक वाहनांच्या काचा फोडल्या. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी हे काही वेळातच जामनेरात दाखल झाले. जमावाला आवर घालण्यासाठी ते स्वत: रस्त्यावर उतरले.  

जामनेरच्या घटनेत दोन पोलिस गंभीर 
जखमी पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. या दगडफेकीत रामदास कुंभार, हितेश महाजन, रमेश कुमावत, संजय राखुंडे, प्रीतम बरकले, संजय खंडारे, सुनील राठोड हे पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांना जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यापैकी रामदास कुंभार, रमेश कुमावत गंभीर जखमी आहेत.
 

भुसावळातही लाठीचार्ज 
दरम्यान, आरोपीला भुसावळ येथून अटक करण्यात आली. त्याला ताब्यात द्यावे, म्हणून भुसावळ येथील नाहटा चौफुलीवरही जमाव जमला होता. या जमावाला पांगण्याविण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
 

Web Title: A mob attacked the police station demanding the custody of the accused 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.