जळगावमध्ये जेवणासाठी बोलावायला गेलेल्या आईला दिसला मुलाचा मृतदेह

By Ajay.patil | Published: October 19, 2023 07:00 PM2023-10-19T19:00:00+5:302023-10-19T19:00:16+5:30

दिनेश मधुकर शिरसाठ (वय ३५) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

A mother who went to call for food in Jalgaon saw the dead body of her son | जळगावमध्ये जेवणासाठी बोलावायला गेलेल्या आईला दिसला मुलाचा मृतदेह

जळगावमध्ये जेवणासाठी बोलावायला गेलेल्या आईला दिसला मुलाचा मृतदेह

जळगाव -दुपार झाली तरी मुलगा जेवायला न आल्यामुळे वरच्या मजल्यावर मुलाला जेवणासाठी बोलवायला गेलेल्या आईला, गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या मुलाचा मृतदेह समोर दिसला. ही दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी १.३० वाजता वाघनगरातील निसर्ग नगर भागात घडली आहे.

दिनेश मधुकर शिरसाठ (वय ३५) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. दिनेश आपली आई व पत्नीसोबत वाघनगर भागातील निसर्ग नगरात वास्तव्यास होता. तसेच शहरातील एका पिझ्झा कंपनीत डिलव्हरी बॉय म्हणून कामाला होता. सकाळी कामावरून घरी परतल्यानंतर दिनेश वरच्या मजल्यावर गेला. दिनेश आपल्या पत्नीसोबत वरच्या मजल्यावर तर आई खालच्या मजल्यावर वास्तव्यास होती. दिनेश वरच्या मजल्यावर गेला असताना, पत्नी व आई खालच्या मजल्यावर होत्या. दुपारी १२.३० ते १ दरम्यान जेवण करणारा, दिनेश दुपारी १.३० वाजेपर्यंत जेवणासाठी न आल्यामुळे आई दिनेशला जेवणासाठी वरच्या मजल्यावर बोलवायला गेली असताना, त्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या दिनेशचा मृतदेह समोर दिसला.

आईला एकुलत्या एक मुलाचा मृतदेह दिसताच धक्का बसला, आईच्या आवाजाने दिनेशची पत्नी देखील वरच्या मजल्याकडे धावत आली. दिनेश मृतदेह पाहताच आई व पत्नीने हंबरडा फोडला. रडण्याचा आवाजाने शेजारी तत्काळ दिनेशच्या घरात दाखल झाले. दिनेशचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. दिनेशला दोन बहिणी आहेत. दिनेशच्या वडिलांचे काही वर्षांपुर्वी निधन झाले आहे. दिनेशच घराचा कर्ता पुरुष होता. दिनेशच्या आत्महत्याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: A mother who went to call for food in Jalgaon saw the dead body of her son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव