पूजेत होम पेटवला, नंतर धूर झाला अन् घडलं विपरीत; पुजाऱ्याच्या मृत्यूने हळहळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 15:03 IST2025-02-06T15:02:35+5:302025-02-06T15:03:21+5:30

जळोद येथे नदी काठावर पुलाखाली जळोद येथील इसमाची उत्तरकार्याची पूजा सुरू होती.

A priest from Amalner died in an attack by bees during the puja | पूजेत होम पेटवला, नंतर धूर झाला अन् घडलं विपरीत; पुजाऱ्याच्या मृत्यूने हळहळ

पूजेत होम पेटवला, नंतर धूर झाला अन् घडलं विपरीत; पुजाऱ्याच्या मृत्यूने हळहळ

अमळनेर : पूजा सुरु असताना मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात अमळनेर येथील एका पुजाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना जळोद येथे नदी काठावर बुधवारी दुपारी घडली. अमोल श्यामकांत शुक्ल (३८, रा. अमळनेर) असे या पुजाऱ्याचे नाव आहे.

अमळनेर तालुक्यातील जळोद येथे नदी काठावर पुलाखाली जळोद येथील इसमाची उत्तरकार्याची पूजा सुरू होती. पूजेत होम पेटवला असता धूर झाल्याने पुलाच्या वर असलेले मधमाशांचे पोळ फुटले. पूजेला बसलेल्यांना त्या चावल्याने सर्व जण सैरावैरा पळू लागले. विशेष म्हणजे मधमाशांच्या हल्ल्यावेळी पुजाऱ्यानेच सर्वांना सावध करण्याचा प्रयत्न केला होता. पण, यात त्यांचाच मृत्यू झाला.
 
इतर पाच ते सहा जणांनादेखील मधमाशा चावल्याने त्यांचे अंग सुजले होते. अमळगाव ग्रामीण रुग्णालयात आणून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. अमोल यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व भाऊ असा परिवार आहे.

त्याचवेळी पुजारी अमोल शुक्ल यांनी इतरांना सांगितले की, पळू नका, खाली झोपून घ्या. त्या चावणार नाहीत. आपण पळालो तर त्या आपल्याला चावतील असे म्हणत ते खाली वाकले. सर्वात जास्त मधमाशा त्यांनाच चावल्या. त्यामुळे जास्त त्रास होऊ लागला. त्यांना उपचारासाठी अमळनेर येथे आणत असताना रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: A priest from Amalner died in an attack by bees during the puja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.