ट्रॅक्टरने घेतला १० वर्षीय बालकाचा बळी; चाकाखाली चिरडून गमावले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 20:37 IST2024-12-14T20:36:55+5:302024-12-14T20:37:10+5:30

अवैधरित्या गौण खनिज वाहणाऱ्या ट्रॅक्टरने त्याला मागून धडक दिली.

A ten year old boy was killed by a tractor in pachora | ट्रॅक्टरने घेतला १० वर्षीय बालकाचा बळी; चाकाखाली चिरडून गमावले प्राण

ट्रॅक्टरने घेतला १० वर्षीय बालकाचा बळी; चाकाखाली चिरडून गमावले प्राण

पाचोरा: वाळूच्या भरधाव ट्रॅक्टरने सायकलवर जाणाऱ्या अथर्व उर्फ रुद्र जितेंद्र गोसावी (रा. राजीव गांधी कॉलनी, पाचोरा) या दहा वर्षीय बालकास चिरडले. यात बालक जागीच ठार झाला. ही भीषण घटना शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास शहरातील शक्ती धामनजीक घडली. ट्रॅक्टर चालकास अटक करण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व हा सा. प. शिंदे विद्यालयातील तिसरीचा विद्यार्थी होता. दुपारी चार वाजेच्या सुमारास घराजवळील शक्तीधाम कार्यालयाजवळ रस्त्यावर सायकलवर फिरत होता. याचवेळी अवैधरित्या गौण खनिज वाहणाऱ्या ट्रॅक्टरने त्याला मागून धडक दिली. यात रुद्र हा मोठ्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाला. घटना घडताच ट्रॅक्टरसह चालक तिथून पसार झाला. 

दरम्यान, तिथं जमलेल्या नागरिकांनी पाठलाग करून ट्रॅक्टर पकडला व चालक विजय अशोक थोरात (३३, रा. पुनगाव, ता पाचोरा) यास पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याला अटक करण्यात आली आहे.

Web Title: A ten year old boy was killed by a tractor in pachora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.