गौण खनिज वाहतुकीवर तिसरा डोळा! १ मेपासून वाहनांना ‘जीपीएस’ प्रणाली सक्तीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2023 05:03 PM2023-04-06T17:03:36+5:302023-04-06T17:03:49+5:30

परवान्यांचेही नुतनीकरण रोखणार, राज्य शासनाने गौण खनिजाचे उत्खननन, वाहतूक, देखरेखीसाठी ‘महाखनिज’ ही संगणकीय प्रणाली तयार केली आहे.

A third eye on secondary mineral transport! GPS system mandatory for vehicles from May 1 | गौण खनिज वाहतुकीवर तिसरा डोळा! १ मेपासून वाहनांना ‘जीपीएस’ प्रणाली सक्तीची

गौण खनिज वाहतुकीवर तिसरा डोळा! १ मेपासून वाहनांना ‘जीपीएस’ प्रणाली सक्तीची

googlenewsNext

कुंदन पाटील

जळगाव - राज्याभरात गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना १ मेपासून ‘जीपीएस’प्रणाली (ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम) सक्तीची केली आहे. त्यामुळे गौण खनिजाची चोरटी वाहतूक करणाऱ्यांना चाप बसणार आहे. तसेच ‘जीपीएस’प्रणाली नसलेल्या वाहनांचा परवान्यांचेही नुतनीकरण रोखण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी ‘जीपीएस’प्रणाली सक्तीची करण्याचे आदेश दिले आहेत.

राज्य शासनाने गौण खनिजाचे उत्खननन, वाहतूक, देखरेखीसाठी ‘महाखनिज’ ही संगणकीय प्रणाली तयार केली आहे. त्यात ‘जीपीएस’ प्रणालीद्वारे या यंत्रणेवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. तसेच गौण खनिज उत्खननासाठी ऑनलाईन परवानगी घ्यावी लागणार आहे.

३१ एप्रिलची डेडलाईन
१ मेपासून जीपीएस प्रणाली नसलेल्या वाहनांना गौण खनिजाच्या वाहतुकीसाठी परवाना दिला जाणार नाही. तसेच १ मेपासून खाणपट्टा मंजुरी, नुतनीकरण, परवाना अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना ३१ एप्रिलपर्यंत ही प्रणाली स्वीकारावी लागणार आहे.

अन्यथा दंड
‘जीपीएस’प्रणालीविना गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर महसुल संहिता १९६६ मधील कलम ४८ (७) व ४८ (८) तसेच महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम २०१३ व दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title: A third eye on secondary mineral transport! GPS system mandatory for vehicles from May 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.