दोन दिवसापूर्वी लग्न झालेल्या तरुणीची प्रियकरासह आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2023 11:26 AM2023-06-26T11:26:28+5:302023-06-26T11:27:07+5:30
अंगावरील हळद फिटण्याआधीच तिने प्रियकरासह आत्महत्या केली.
- शामकांत सराफ
पाचोरा (जि.जळगाव) : शुक्रवारीच लग्न झालेल्या युवतीने आपल्या प्रियकरासह आत्महत्या केली. ही घटना पाचोरा येथे सिंधी कॅम्प परिसरातील एका पडक्या शाळेत रविवारी रात्री घडली.
साक्षी सोमनाथ भोई (वय १८ वर्षे) आणि जितेंद्र राजेंद्र राठोड (वय १८ वर्षे, दोघेही रा. वरखेडी नाका, पाचोरा) अशी या आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाचे नाव आहे.
साक्षी हिचा विवाह शुक्रवारी शिंदखेडा येथे झाला होता. रविवारी ती लग्नानंतर पाचोरा येथे आली होती. अंगावरील हळद फिटण्याआधीच तिने प्रियकरासह आत्महत्या केली.