‘बेमोसमी’च्या तडाख्याने हिरावले युवकासह पशुधनाचे आयुष्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2023 07:07 PM2023-03-16T19:07:16+5:302023-03-16T19:07:39+5:30
जळगाव जिल्ह्यात बुधवारी रात्री झालेल्या वादळी पावसाने निंभोरा येथील युवकाचा बळी घेतला आहे.
कुंदन पाटील
जळगाव : जिल्ह्यात बुधवारी रात्री झालेल्या वादळी पावसाने निंभोरा (अमळनेर) येथील युवकाचा बळी घेतला आहे. तर वलवाडी (भडगाव) येथे वीज कोसळून बैल ठार झाला आहे. बुधवारी रात्री जिल्ह्यात वादळासह बेमोसमी पावसाने हजेरी लावली. विजांचा प्रचंड कडकडाटासह झालेल्या पावसामुळे गव्हाचे नुकसान झाले आहे. तर आंब्याचा मोहोरही गळून पडला आहे.
तशातच निंभोरा (अमळनेर) येथील संजय सागर धनगर (३५) या दुचाकीस्वाराच्या डोक्यात झाडीची फांदी कोसळली. त्यातच संजयचा जागीच मृत्यू झाला. तर वलवाडी बुद्रूक (भडगाव) येथील विठ्ठल त्र्यंबक पाटील यांच्या मालकीच्या बैलाच्या अंगावर वीज कोसळल्याने तो जागीच ठार झाला आहे.
बिबट्याकडून वासराचा फडशा
पळसोद (जळगाव) येथील हिंमत बळीराम पाटील यांच्या वासराचा बिबट्याने फडशा पाडला.गुरुवारी सकाळी ही घटना उजेडात आली.