अबब.. जळगावात विष्णू मनोहर यांनी तयार केली 500 किलो भाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 02:22 PM2017-12-22T14:22:43+5:302017-12-22T14:23:10+5:30
खाद्य महोत्सव
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 22- मराठी प्रतिष्ठान, परेश फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य पर्यटन मंडळ आयोजित गिरणाई महाराष्ट्र खाद्य व टुरीझम महोत्सवाचा शुक्रवार, 22 रोजी जळगाव येथे सागर पार्कवर शुभारंभ झाला. यामध्ये पाककला तज्ज्ञ विष्णू मनोहर व महाराष्ट्र किचन क्वीन प्राजक्ता शाहपूरकर यांच्या अनोख्या चवीने 500 किलो सेंद्रीय भाजी बनविण्यात आली. एकाच वेळी व एकाच भांडय़ात तयार करण्यात आलेल्या या 500 किलो भाजीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. भाजीची ही कला पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी झाली होती. यानंतर अनेकांनी ही भाजी डब्यामध्ये नेऊन तिचा आस्वाद घेतला.
या महोत्सवात 100 विविध पदार्थ एकाच स्टॉलवर उपलब्ध असून गृहपयोगी वस्तूदेखील उपलब्ध आहे.
22 ते 26 डिसेंबर दरम्यान दररोज सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल राहणार असून दुपारी 4 ते रात्री 10 दरम्यान खाद्य महोत्सव असेल.