८१ टक्के विद्यार्थ्यांची आधार नोंदणी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:27 AM2021-02-06T04:27:09+5:302021-02-06T04:27:09+5:30
जळगाव : जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील ८१.५५ टक्के विद्यार्थ्यांची ऑनलाइन आधार नोंदणी पूर्ण झाली असून उर्वरित विद्यार्थ्यांची लवकरच नोंदणी केली ...
जळगाव : जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील ८१.५५ टक्के विद्यार्थ्यांची ऑनलाइन आधार नोंदणी पूर्ण झाली असून उर्वरित विद्यार्थ्यांची लवकरच नोंदणी केली जाणार असल्याची माहिती शुक्रवारी मुख्याध्यापक आढावा बैठकीत देण्यात आली. विशेष म्हणजे, ज्या शाळांनी उत्कृष्ट आधार नोंदणी केली, अशा शाळांच्या मुख्याध्यापकांचा सत्कार बैठकीत करण्यात आला.
विद्यार्थी आधार नोंदणी आढावा घेण्यासाठी महानगरपालिका शिक्षण मंडळातर्फे शुक्रवारी प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपशिक्षणाधिकारी विजय पवार, राजेंद्र सपकाळे आदींसह मुख्याध्यापकांची उपस्थिती होती. बैठकीच्या सुरुवातीला विजय पवार यांनी विद्यार्थी आधार नोंदणी, फिट इंडिया योजना, तंबाखूमुक्त शाळा अभियान या संदर्भात आढावा घेऊन मार्गदर्शन केले़ नंतर शाळांच्या समस्या सोडविण्यात येतील, असेही आश्वासन दिले. तसेच प्रभारी उपशिक्षणाधिकारी राजेंद्र सपकाळे यांनी आरटीई प्रतिपूर्ती, आरटीई मान्यता यावर मार्गदर्शन केले.
या शाळांचा गौरव
बैठकीमध्ये उत्कृष्ट आधार नोंदणी काम करणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये मूकबधिर विद्यालय, गुरुवर्य प.वि. पाटील विद्यामंदिर, बी.यू.एन. रायसोनी मराठी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांचा समावेश होता. याप्रसंगी शाकीबा शेख, प्रीती सुरंगे, सुनील सरोदे, सूरज साळुंखे, कैलास तायडे, अशोक मदाने उपस्थित होते. सूत्रसंचालन कैलास तायडे यांनी केले तर आभार सुनील सरोदे यांनी मानले.
००००००००००००००००००००००००००००००
जळगाव मनपा क्षेत्रातील एकूण विद्यार्थी
- १ लाख ३ हजार ७४
०००००००००००००००००००००००००००००
आधार नोंदणी केलेले विद्यार्थी
- ८४ हजार ६१
०००००००००००००००००००००००००००००
आधार नोंदणी बाकी असलेले विद्यार्थी
- १९ हजार १३
०००००००००००००००००००००००००
आधार अपलोड टक्केवारी
- ८१.५५ टक्के