आखाजीचे घरोघरी पितरांचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 08:08 PM2019-05-07T20:08:21+5:302019-05-07T20:08:46+5:30

केळीच्या पानांचा तुटवडा

Aakha's house worshiping the ancestors | आखाजीचे घरोघरी पितरांचे पूजन

आखाजीचे घरोघरी पितरांचे पूजन

Next

जळगाव : अक्षय्यतृतीयेच्या खरेदीसोबतच मंगळवारी घरोघरी पितरांचे पूजन करण्यात आले. खान्देशात आखाजी म्हणून मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या या सणाला घागर भरण्याची प्रथा आहे. त्यानुसार सर्वत्र घागर भरून पितरांचे स्मरण करण्यात आले. यासाठी आंब्यासह खरबूज, केळीचे पाने यांच्यासह पूजा साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आले. यात खरबूजचे भाव तर चांगलेच वधारले होते. ६० ते ७० रुपये प्रती किलोवर खरबूजचे भाव पोहचले होते. यात एक फळ घ्यायचे झाल्यास किमान ९० ते १०० रुपये मोजावे लागत होते.
केळीच्या पानांचा तर आज मोठा तुटवडा जाणवला. मंगळवारी चार पाने १० रुपयांना विक्री होत होते.
या सर्व वस्तूंची खरेदी झाल्यानंतर घरोघरी पूरणपोळी, आमरस, कुरडई-पापड, भजी, सांजोरी असा स्वयंपाक होऊन घागर भरुन पितरांना या सर्व मिष्टान्नांचा नेवैद्य दाखविण्यात आला. घागर, त्यावर खरबूज, कुरडई, सांजोरी ठेवून मुलांनाही या प्रथेची माहिती दिली.

Web Title: Aakha's house worshiping the ancestors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव